मिक्स धान्यांच्या चकल्या

मिक्स धान्यांच्या चकल्या

Chakli

साहित्य

हरभरे, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मूग, मटकी, चवळी, मसूर, वाल, तूरडाळ, धने, तीळ, ओवा, तिखट, मीठ, काळा मसाला, तेल.

कृती

वर दिलेली सर्व धान्ये प्रत्येकी एक वाटी घ्यावीत. सर्व धान्ये भाजून घ्यावीत व एकत्र करून दळावीत. नंतर त्या पिठात एक वाटी तेल तापवून घालावे व एक वाटी तीळ, एक वाटी तिखट, हळद व चवीप्रमाणे मीठ व काळा मसाला व थोडा ओवाही घालावा. नंतर त्या पिठात दोन-तीन वाट्या उकळते पाणी घालावे. नंतर ते पीठ गार पाण्यात भिजवून चांगले मळून त्याच्या चकल्या पाडून खरपूस तळून काढाव्यात.

First Published on: November 8, 2018 12:55 AM
Exit mobile version