Friday, May 17, 2024
घरमानिनीBeautyMonsoon: पावसाळ्यात अशी घ्या नखांची काळजी

Monsoon: पावसाळ्यात अशी घ्या नखांची काळजी

Subscribe

पावसाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. त्यामुळे त्वचा आणि केसांची एक्स्ट्रा काळजी घेणे फार महत्वाचे आहे. पावसाळ्यात नखांची काळजी सुद्धा घेतली पाहिजे. कारण यावेळी नखं फार पातळ होतात आणि क्युटिकल्स ही खराब होतात. खरंतर महिलांना नखं वाढवणे फार आवडते. त्यामुळे पावसाळ्यात खासकरुन महिलांनी नखांची काळजी घ्यावी.  (Nail care in monsoon)

बाजारात बहुतांश हँन्ड क्रिम मिळतात ज्या तुमच्या हातांची आणि नखांची काळजी घेतात. परंतु त्याचा परिणाम दीर्घकाळ राहत नाही व त्या महाग ही असतात. अशातच तुम्ही काही घरगुती उपायांनी पावसाळ्यात नखांची काळजी घेऊ शकता.

- Advertisement -

सैंधव मीठ आणि गरम पाणी
दिवसभर आपण आपल्या हाताने काम करतो. त्यामुळे त्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. यामुळे रात्री झोपण्यापूर्वी दररोज कोमट पाण्यात सैंधव मीठ टाकून त्यात तुमचे हात थोडावेळ बुडवून ठेवा. पाच ते दहा मिनिट हात बुडवून ठेवल्यानतर हाताला हँन्ड क्रिम लावा. यामुळे तुमचे नखं आणि त्वचा सॉफ्ट राहते.

- Advertisement -

ऑलिव्ह ऑइल
ऑलिव्ह ऑइल लावल्याने नखांना चमक येते. अशातच तुम्ही ऑलिव्ह ऑइल थोडं गरम करुन नखांना मसाज करा आणि नंतर हात पाण्याने वॉश करा. असे तुम्ही दिवसातून 2 वेळा करा. या व्यतिरिक्त तुम्ही ऑलिव्ह ऑइलमध्ये काही थेंब टी-ट्री सुद्धा मिक्स करा. कारण यामुळे तुमची स्किन हाइड्रेट राहिल.

मध
जर तुमचे क्युटिकल्स खराब झाले असतील तर त्यावर मध लावा. 15 मिनिटांपर्यंत ते लावून ठेवा. त्यानंतर मध नखांवरुन काढून टाका. खरंतर मधात नॅच्युरल मॉइश्चराइजर असते.

रॉ मिल्क
रॉ मिल्कमध्ये फॅटी अॅसिड अशते. जे नखांच्या आणि स्किनसाठी फायदेशीर असते. यासाठी काही वेळ दुधात तुमची बोट बुडवून ठेवा. हे तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी करु शकता.


हेही वाचा-Monsoon: पावसाळ्यात त्वचेची घ्या अशी काळजी

- Advertisment -

Manini