Mud Bath थेरपीने होतील ‘हे’ फायदे

Mud Bath थेरपीने होतील ‘हे’ फायदे

आपल्या लाइफस्टाइलमध्ये नैसर्गिक गोष्टींचा वापर करणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. यामुळे काही समस्या ही दूरहोतात. पृथ्वीवर अशी काही खनिजे आणि पोषक तत्त्व आहेत जे आपल्या शरिराला हेल्दी ठेवण्यास मदत करतात. याच्या मदतीने तुम्ही उत्तम आयुष्य जगू शकता. (Mud bath therapy)

अशातच मड थेरपी अशी एक अनोखी थेरपी आहे त्याचा वापर करून काही आजार दूर होऊ शकतात. जागतिक स्तरावर हळूहळू मड थेरपी प्रसिद्ध होऊ लागली आहे. याच्या मदतीने तुम्ही तुमची स्किन उत्तम होण्यासह, त्यावर पडणारे डाग आणि मान्सून दरम्यान रोग ही दूर होतात. अशातच मड बाथचे फायदे जाणून घेऊयात.

-पाचनक्रिया उत्तम होते
मातीत शरिरातील सर्वाधिक विषारी पदार्थांना अवशोषित करण्याचा गुण असतो. पोटाच्या चारही बाजूला माती लावल्यास तुमची पनचक्रिया सुधारते आणि तुम्ही नैसर्गिकरित्या डिटॉक्स राहता. त्याचसोबत शरिरातील मेटाबॉलिज्म ही वेगवान होते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

-डोकेदुखीवर लाभदायी
तापाच्या कारणास्तव लक्ष केंद्रित करणे मुश्किल होते तर मड थेरपीची मदत घेऊ शकता. पोटाच्या आसपास माती लावल्याने अतिरिक्त गरमीपासून दूर राहू शकता आणि शरिर थंड राहण्यास मदत होते. त्याचसोबत हिट स्ट्रोकच्या समस्येपासून ही यामुळे आराम मिळतो. जेव्हा तुमचे खुप डोकं दुखत असेल तेव्हा औषधांऐवजी अशा प्रकारच्या ऑप्शनची निवड करू शकता.

-त्वचेसाठी फायदेशीर
मड थेरपीचा सर्वाधिक मोठा फायदा हा त्वचेला होतो. आयुर्वेदानुसार मातीत विषारी पदार्थ दूर करण्याचा गुण असतो. शरिरातील पित्त ती नियंत्रित करू शकते. त्याचसोबत त्वचा ही मऊ आणि तजेलदार ही होते.

-तणावापासून दूर राहता
माती ही नैसर्गिक रुपात थंड असते. यासाठी ही थेरपी तणापासून दूर राहण्यासाठी तुम्हाला मदत करू शकते.


हेही वाचा- स्लॅप थेरपी वाढवेल तुमचे सौंदर्य

 

First Published on: August 25, 2023 12:24 PM
Exit mobile version