‘मशरुम पुलाव’ रेसिपी

‘मशरुम पुलाव’ रेसिपी

'मशरुम पुलाव' रेसिपी

बऱ्याचदा रविवार म्हटलं का अनेक जण मांसाहारावर ताव मारतात. पण, शाकाहारी व्यक्तींना ते खाणे शक्य नसते. मग अशावेळी काय करावे? असा प्रश्न अनेकांना पडतो. यांच्याकरता आज आम्ही तुम्हाला मशरुम पुलावची रेसिपी सांगणार आहोत. यामुळे तुमचा रविवार अधिकच मस्त जाण्यास मदत होईल.

साहित्य

कृती

सर्वप्रथम तांदूळ धुऊन स्वच्छ करून तासभर भिजवत ठेवा. त्यावनंतर मशरूम चांगले धुऊन बारीक आणि लांब चिरुन घ्यावे. यासोबतच कांदा, ढोबळी मिरची, गाजर हे साहित्य देखील लांब चिरुन घ्यावे. एका पातेल्यात तूप गरम करुन त्यात कांदा टाकून परता. कांदा गुलाबी झाल्यावर गरम मसाला, मीठ आणि मशरूम टाकून शिजवून घ्या. त्यानंतर आता त्यात ढोबळी मिरची, गाजर आणि पनीर टाका. नंतर या तयार मिश्रणात तांदूळ टाकून ४ वाटी पाणी टाका आणि मंद आचेवर गॅस करुन झाकून शिजवा. शिजल्यावर गरम-गरम वाढा. यासोबत तुम्ही कुरकुरीत पापड किंवा रायत्याचा देखील समावेश करु शकता.


हेही वाचा – ‘या’ कुकिंग टीप्स स्वयंपाकमध्ये फार उपयुक्त ठरतील


 

First Published on: June 7, 2020 6:22 AM
Exit mobile version