Heat Stroke :उष्माघात टाळण्यासाठी अवश्य खावीत ही फळे

Heat Stroke :उष्माघात टाळण्यासाठी अवश्य खावीत ही फळे

उन्हाळ्यात तीव्र उष्णतेमुळे आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. कडक ऊन आणि उष्ण वाऱ्यामुळे अनेकदा बऱ्याच जणांना उष्माघात होतो. जेव्हा तुम्ही जास्त वेळ उन्हात काम करता तेव्हा शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते आणि तुम्हाला उष्माघात होतो. उष्माघातामुळे चक्कर येणे, बेशुद्ध होणे, तीव्र डोकेदुखी आणि ताप सुद्धा येतो. अशावेळी तुम्ही आहारात काही फळांचा समावेश केल्यास उष्माघातापासून स्वतःचा बचाव करू शकता.

उष्माघात टाळण्यासाठी फळे –

  1. उन्हाळ्यात जाणवणारा उष्माघात टाळण्यासाठी कलिंगडचे सेवन करू शकता. कलिंगडमध्ये 90 ते 92 % पाणी असते. यामुळे उन्हाळ्यात डिहायड्रेशन टाळण्यासाठी कलिंगड अवश्य खा. कलिंगडाच्या सेवनाने डिहायड्रेशनची समस्या दूर होण्यास मदत होते.
  2. उष्माघात टाळण्यासाठी वूड ऍपल अर्थात बेलाचे फळ खावे. बेलाचे फळ थंड असते. बेलाचे फळ खाल्यास शरीर डिहायड्रेट होण्यापासून रोखले जाते. त्यामुळे उन्हाळ्यात बेलाचे फळ अवश्य खावे. अशा प्रकारे उष्णतेच्या लाटेपासून बेलाचे फळ खाऊन तुम्ही शरीर सुरक्षित ठेऊ शकता.
  3. अननसाचे सेवन केल्याने शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते. त्यामुळे तज्ज्ञ सुद्धा उन्हाळ्यात अननस खाण्याचा सल्ला देतात. अननसात अँटीऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात असतात जे फ्री रॅडिकल्सशी लढण्यासाठी उपयुक्त ठरतात. याशिवाय अननसात ब्रोमेलेन नावाचे एंजाइम असते ज्याने शरीरातील जळजळ कमी होते.
  4. उन्हाळ्यात तुम्ही संत्र्याचे सेवन करू शकता. संत्र्यामुळे शरीरात हायड्रेशन टिकून राहते तसेच शरीराला एनर्जीही मिळते. संत्री ‘व्हिटॅमिन सी’ चा प्रमुख स्रोत असल्याने संत्र्याच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्ती वाढते.
  5. उष्माघात टाळण्यासाठी तुम्ही खरबूजही खाऊ शकता. यामुळे शरीराला पुरेसे हायड्रेशन मिळते. खरबूजमध्ये ‘व्हिटॅमिन सी’ असल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

उष्माघात टाळण्यासाठी तुम्ही पुढील गोष्टीही करायला हव्यात –

  1. दिवसातून किमान 2 लिटर तरी पाणी प्या. पाण्याव्यतिरिक्त फ्रुट ज्यूस, नारळ पाणी किंवा लिंबू पाणीही पिऊ शकता.
  2. उन्हाळ्यात कायम हलक्या आहारालाच प्राधान्य द्यावे. जाड पदार्थ खाणे टाळावे.
  3. ज्यांना उन्हाळ्यात उष्माघाताचा त्रास होतो अशा व्यक्तीने जवळ कांदा बाळगावा. कांदा खिशात ठेवला की, ते शरीरातील उष्णता शोषून घेतात आणि शरीराचे तापमान संतुलित राहते.
  4. जास्त तेलकट – तिखट पदार्थ खाणे टाळा. तेलकट पदार्थामुळे उन्हाळ्यात शरीरावर विपरीत परिणाम होतात. यात जळजळ, गॅस अशा समस्या उदभवतात.

 

Edited by – chaitali shinde


हेही पहा : सॅलड कधी खावे ?

 

First Published on: April 12, 2024 2:55 PM
Exit mobile version