नागपुरी वडा भात

नागपुरी वडा भात

नागपुरी वडा भात

दररोज मसाला भात किंवा अंडा भात खाऊन फार कंटाळा येतो. अशावेळी काहीतरी वेगळे खाण्याची इच्छा असते. चला तर आज नागपुरी वडा भात कसा बनवायच तो पाहूया.

साहित्य

२ वाट्या बासमती
मिश्र डाळी (मसूर, उडीद, हरभरा) धने
जिरे
लाल मिरच्या
मीठ
हिंग
तेल

कृती

सर्व डाळी एकत्र भिजवून ठेवाव्या. भिजल्यावर वाटताना त्यात धने, जिरे, मीठ, हिंग, लाल मिरच्या घालाव्या. कढईत तेल तापवून या मिश्रणाचे वडे तयार करावे. तयार भात पानात वाढून त्यावर वडे कुसकरून घालावेत. या भातावर लसणीचं फोडणीचं तेल किंवा तळणीचं तेल घालून खायला द्यावा.

First Published on: February 2, 2020 6:30 AM
Exit mobile version