नैसर्गिक उपायांनी पळवा घरातील किटके

नैसर्गिक उपायांनी पळवा घरातील किटके

किटके

मच्छरपासून बचावासाठी लसूण –
स्वयंपाकघरात आवर्जून आढळणारे लसूण वासाला उग्र आहे. या उग्र वासामुळे मच्छर दूर राहण्यास मदत होते. यासाठी लसणाच्या काही पाकळ्या ठेचून पाण्यात उकळा. हे पाणी घरात स्प्रे करा. मच्छर दूर ठेवण्यासाठी तुम्ही हे देखील नैसर्गिक उपाय नक्की करून पहा.

मुंग्यांसाठी व्हाईट व्हिनेगर
ऋतू कोणताही असो स्वयंपाकघरात मुंग्याचा वावर हमखास दिसतो. मग आता तुम्हांला मुंग्या दिसल्या की त्यावर थोडे व्हाईट व्हिनेगर स्प्रे करा. पण कार्पेट किंवा एखाद्या कापडावर व्हाईट व्हिनेगर मारण्याआधी ते छोट्याशा कापडावर मारून पहा. मगच त्याचा वापर करा.

झुरळ्यांपासून बचाव करण्यासाठी बोरीक पावडर –
घरातून झुरळांना हटकण्यासाठी पेस्टकंट्रोलचा पर्याय निवड्याआधी हा प्रयोग नक्की करून पहा. चमचाभर गव्हाच्या पीठामध्ये बोरीक पावडर मिसळून तयार मिश्रणाचा गोळा मळा. त्याचे लहान लहान गोळे बनवून घरातील कोपर्यात ठेवा. या उपायामुळे झुरळांचा वावर कमी होण्यास मदत होते.

सायट्रस सालींमुळे कोळी दूर राहतात –
कोळ्यांचा घरातील वावर वाढला की कोपर्यांमध्ये जळमट वाढतात. म्हणूनच त्यांना दूर करण्यासाठी संत्र, लिंबू, मोसंबी अशा सायट्रस फळांच्या सालींचा वापर करा. घराची सफाई झाल्यानंतर जेथे कोळ्यांचे जाळे आढळू शकते अशा ठिकाणी या सायट्रस फळांच्या साली चोळा. बुकशेल्फ, कोपरे, दारं खिडक्यांच्या आसपास या साली चोळाव्यात.

कापूरामुळे माश्या दूर राहतील –
कापूरामुळे घरातील माश्यांचा त्रास दूर होतो. घरातील कोपर्यांमध्ये काही कापरांचे तुकडे टाकून ठेवा. जर घरात माश्या खूपच असतील तर कापूर जाळा. त्याच्या धुरामुळे माश्या दूर होतात.
मग साफसफाई करून झाल्यानंतर पेस्टकंट्रोल करून त्रास वाढवण्यापेक्षा हे नैसर्गिक उपाय नक्की करून पहा.

आरोग्यास घातक मीठ
मीठ खाताना जरा जपून… असे सल्ले आपण अनेकदा ऐकतो. खाण्यात मीठाचं प्रमाण वाढलेलं असेल तर उच्च रक्तदाबाचा त्रास उध्दभवतो, हे आपल्याला एव्हाना माहीत असेलच पण याच मीठामुळे तुमच्या हृदयालाही धोका आहे.

अमेरिकेत केल्या गेलेल्या एका नव्या संशोधनात ही गोष्ट समोर आलीय. अधिक प्रमाणात मीठ खाण्याची सवय असणार्या व्यक्तींचा वेळेअगोदरच मृत्यू होतो, असं या शोधातून समोर आलंय. अमेरिकन सरकारच्या ’सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अ‍ॅन्ड प्रिव्हेंशने केलेल्या शोधात ही गोष्ट समोर आलीय.

उल्लेखनीय म्हणजे, फास्ट फूड आणि डब्बाबंद जेवणं खाणार्या व्यक्तींना सामान्यांपेक्षा जास्त मीठ खाण्याची सवय असते, असंही यामध्ये नमूद करण्यात आलंय.

शोधानुसार, मीठ शरीराला इतकं हानीकारक आहे… की त्रास उध्दवल्यानंतर तुम्ही मीठ खाणं पूर्णपणे बंद केलं तरीदेखील तुमच्या शरीराची झालेली हानी भरून निघू शकत नाही.

मीठात सोडियम असतं… आणि सोडियमचं अधिक प्रमाण शरीरातील रक्तसंचाराची गती अधिक वाढवतं… आणि त्यामुळे हृद्यविकाराच्या धोक्याची शक्यता वाढते.

यामुळे, आता तुम्हाला समजलंच असेल की जेवणात मीठाचा योग्य प्रमाणात वापर करणं किती गरजेचं आहे… मग, वेळेवरच सावरा… आणि तुमच्या हृदयाची काळजी घ्या.

First Published on: October 20, 2018 12:31 AM
Exit mobile version