पिंपल्सपासून सुटका हवी? या रसाचा करा वापर

पिंपल्सपासून सुटका हवी? या रसाचा करा वापर

लिंबा रस अनेक प्रकारचे पेय बनवण्यासाठी वापरला जातो. लिंबू चवीला आंबट असले तरी लिंबाचे फायदे अनेक आहेत. लिंबाचा वापर शरीरासाठीच नाही तर सौंदर्य खुलवण्यासाठी देखील केला जातो. लिंबामध्ये असणार्‍या अ‍ॅन्टी-बॅक्टेरियल गुणांमुळे तुम्ही तुमच्या चेहर्‍यांवरचे डाग आणि पिंपल्स दूर करू शकतात.

पिंपल्स दूर करण्यासाठी लिंबाचा रस

लिंबू आणि टोमॅटोचा रस एकत्र करुन चेहर्‍याला लावल्यास त्वचेवरील मृत त्वचा निघून जाण्यास मदत होते. तसेच या मिश्रणाचा नियमित वापर केल्यास ब्लॅकहेड्स, पिंपल्स निघून जातात आणि त्वचेचा पोत सुधारतो. या उपायांमुळे काही दिवसांतच तुमचा चेहरा उजळून निघेल. आणि पिंपल्सची तुमची समस्या कायमची दूर होईल.

एका वाटीत चण्याची पावडर घ्या त्यामध्ये लिंबाचा रस मिसळून घ्या. त्याची चांगली पेस्ट बनवून पिंपल्स असलेल्या त्वचेवर लावू शकता. त्यानंतर कोमट पाण्यानं चेहरा धुवून घ्या. त्वचा कोरडी वाटल्यास थोडं माईश्चरायजरचा वापर करू शकता.

एका वाटीत लिंबाचा रस आणि दही एकत्र करून घ्या. ही पेस्ट चेहर्‍यावर लावा. काही वेळानंतर कोमट पाण्यानं चेहरा धुवून घ्या.

 


हेही वाचा :

Hair Removal Cream: हेअर रिमूव्हर क्रीमचे साईड इफेक्ट्स

First Published on: April 12, 2024 2:07 PM
Exit mobile version