Monday, April 29, 2024
घरमानिनीBeautyHair Removal Cream: हेअर रिमूव्हर क्रीमचे साईड इफेक्ट्स

Hair Removal Cream: हेअर रिमूव्हर क्रीमचे साईड इफेक्ट्स

Subscribe

हेअर रिमूव्हर क्रीम केस काढण्याचा अगदी सोपा मार्ग कारण त्यामुळे कमीत कमी वेदना होतात. म्हणूनच अनेक महिलांचा ही क्रीम वापरण्याकडे अधिक कल असतो. आजकाल बाजारात केस काढण्याचा अनेक क्रीम उपलब्ध आहेत, ज्याच्या जाहिराती टीव्हीवर प्रसारित करण्यात येतात. प्रत्येक कंपनी इतर कंपन्यांपेक्षा त्याची क्रीम कशी बेस्ट आहे याचा दावा करत असते.

त्वचारोग तज्ञांच्या मताचा विचार केल्यास हेअर रिमूव्हर क्रीममुळे त्वचेवर अनेक साईड इफेक्ट्स होतात. त्यामुळे तज्ज्ञांच्या मते, हेअर रिमूव्हल क्रीम खरेदी करण्यापूर्वी त्वचेवर जळजळ होते का नाही ते पहाणे गरजेचे असते. यासाठी तुम्ही त्वचेवर पॅच टेस्ट करून घेऊ शकता.

- Advertisement -

हेअर रिमूव्हर क्रीम काम कशी करते – हेअर रिमूव्हिंग क्रीममध्ये कॅल्शियम हायड्रॉक्साइड आणि पोटॅशियम हायड्रॉक्साइड सारखी केमिकल असतात. त्यामुळे त्वचेवर क्रीम लावल्यास केस वितळतात आणि बाहेर पडतात. त्यामुळे वेदना होत नाही आणि केसही बाहेर पडतात.

साईड इफेक्ट्स –

- Advertisement -

हेअर रिमूव्हल क्रीममध्ये केमिकल असल्याने त्वचेवर जळजळ जाणवते. जर हेअर रिमूव्हल क्रीम चेहरा, प्रायव्हेट पार्ट आणि सेन्सिटिव्ह त्वचेवर लावल्यास तुम्हाला याची रिॲक्शन होऊ शकते.

हेअर रिमूव्हल क्रीममुळे त्वचा काळी होऊ शकते आणि त्वचा जर सेन्सिटिव्ह असेल तर पुरळ उठण्याची शक्यता निर्माण होते.

हेअर रिमूव्हल क्रीमचा पीएच तुमची त्वचा खराब करू शकते.

सेन्सिटिव्ह स्किन असलेल्या व्यक्तींनी हेअर रिमूव्हल क्रीमचा वापर टाळावा असे वारंवार तंज्ञांकडून सांगण्यात येते.

हेअर रिमूव्हल क्रीममुळे केसांची वाढ दुपटीने वाढते शिवाय केस अधिक दाट होतात.

जेव्हा तुम्ही हेअर रिमूव्हल क्रीम वापरता तेव्हा त्याचा पीएच नक्की तपासा. जर तुमच्या त्वचेवर आधीपासूनच काही जखम किंवा ओरखडे असतील तर त्याजागी चुकूनही हेअर रिमूव्हल क्रीम लावू नका. याने त्वचेवर गंभीर परिणाम होऊ शकतात.

हेअर रिमूव्हल क्रीम किती वेळा वापरणे योग्य – प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावरील केसांची वाढ वेगवेगळ्या गतीने होत असते. अनेकांना दर आठवड्याला आणि काहींना महिन्यातून एकदाच याची गरज भासते. पण, असे असले तरी तुम्ही वारंवार हेअर रिमूव्हल क्रीम वापरणे टाळले पाहिजे. अशाने तुमची त्वचा जळू शकते.

 

 

 

 

 


हेही पहा :  Skincare Tips I दररोज मेकअप करणे पडेल महाग

 

- Advertisment -

Manini