अशा स्थितीत वजन करणे टाळा, मिळेल चुकीची माहिती

अशा स्थितीत वजन करणे टाळा, मिळेल चुकीची माहिती

वजन कमी करण्यासाठी विविध उपाय केले जातात. अशातच ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे किंवा जे करत आहेत ते वेळोवेळी आपले वजन किती कमी झाले हे तपासून पाहतात. मात्र वजन तपासून पाहण्यापूर्वी हे जाणून घेणे जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे की, तुम्ही ते कधी तपासून पाहताय. काही स्थितींमध्ये जर तुम्ही वजन करुन पाहिले तर तुम्हाला चुकीची माहिती मिळू शकते. (weight check mistakes)

बद्धकोठता


बद्धकोठतेमुळे तुमच्या शरिरात पाणी जमा होऊ शकते. त्यामुळे अस्थायी रुपात सूज आणि वजन कमी-अधिक होऊ शकते. बहुतांशवेळा तुम्हाला या स्थितीत वजन वाढलेलेच दाखवले जाते.

जेवण जेवल्यानंतर


जेवल्यानंतर तुमचे शरिर पाचन क्रियेच्या मदतीसाठी शरिरातील पाण्याचा वापर केला जातो. अस्थायी वॉटर रिटेंशनमुळे वजन वाढलेले दिसू शकते. या वेळी तुम्हाला वास्तविक शरिराचे वजन दाखवले जात नाही. तुम्ही जे जेवता आणि द्रव पदार्थांचे वजन मिळून तुम्हाला वजन काट्यावर तुमचे वजन दाखवले जाते.

पार्टीनंतर


पार्टीमध्ये असे काही फूड्स असतात जे तुमची कॅलरीज वाढवू शकतात. या फूड्स किंवा पेयांमध्ये सोडियम आणि कार्बोहाइड्रेट्स अधिक असू शकतात. यामुळे अस्थायी रुपात वॉटर रिटेंशन आणि सूज येण्याची शक्यता होऊ शकते. अशातच तुमचे वजन वाढलेले दिसते.

अपुरी झोप


झोप ही लेप्टिन आणि घ्रेलिन सारख्या भूक हार्मोनला रेग्युलेट करण्यास महत्त्वाची भुमिका निभावतात. जेव्हा तुम्ही पुरेशी झोप घेत नाहीत तेव्हा हे हार्मोन बाधित होऊ शकतात. त्यामुळे भूक वाढली जाते आणि आपण अधिक खातो. अशातच तुमचे वजन वाढले जाऊ शकते.


हेही वाचा- पोळी खाणे बंद केल्याने वजन कमी होते का?

First Published on: July 30, 2023 12:06 PM
Exit mobile version