Tuesday, May 7, 2024
घरमानिनीHealthरात्री बेरात्री उठून खाता, मग व्हा सावध

रात्री बेरात्री उठून खाता, मग व्हा सावध

Subscribe

काही लोकांना रात्री उशिरा उठून खाण्याची सवय असते. मात्र असे करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जात नाही. आयुर्वेदानुसार सुर्यास्तानंतर करण्यात आलेल्या भोजनामुळे शरिराला फायदा नव्हे तर नुकसानच अधिक होते.

परंतु झोपेतून उठून खाण्याची सवय ही आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. याला वैद्यकिय टर्ममध्ये ‘नाइट इटिंग सिंड्रोम’ असे म्हटले जाते. ही इटिंग डिसऑर्डर ज्यांना इंसोनेमियाची समस्या असते त्यांच्यामध्ये अधिक दिसून येते. रात्री व्यक्तीला जर खुप वेळ झोप येत नसेल आणि तो जागा राहत असेल तर त्या समस्येला इंसोमेनिया असे म्हटले जाते. झोपेतून उठून खाण्याच्या सवयीमुळे हळूहळू लाइफस्टाइल संबंधित काही समस्या येऊ लागतात.

- Advertisement -

नॅशनल इंस्टिट्युट ऑफ मेंटल हेल्थनुसार, नाइट इटिंग सिंड्रोम 1-2 टक्के लोकसंख्या प्रभावित होते. जी पुरुष आणि महिलांमध्ये दिसून येतें. जी लोक लठ्ठ असतात आणि ज्यांना खाण्यासंबंधित समस्या असते त्यांना नाइट इटिंग सिंड्रोमची समस्या होऊ शकते.

त्याचसोबत डॉक्टर असे म्हणतात की, नाइट इटिंग डिसऑर्डर लठ्ठपणा वाढवते. त्याचसोबत मधुमेह, मेटाबोलिक समस्या, हार्ट डिजीज आणि हार्ट स्ट्रोक सारखे गंभीर आजारांचे कारण ठरू शकते. तर एका रिसर्चनुसार, पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये नाइट इटिंग सिंड्रोमची लक्षणे अधिक असण्याची शक्यता असते. याच कारणास्तव एंग्जायटी, डिप्रेशन आणि रात्री झोप न येणे अशा समस्या उद्भवू शकतात.

- Advertisement -

नाइट इटिंग सिंड्रोममागे असू शकतात काही कारणे
हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते, नाइट इटिं सिंड्रोमच्या मागे काही कारणे असू शकता. व्यक्तीमधील बॉयोलॉजिक क्लॉक 24 तास चालत राहते. हे क्लॉक व्यक्तीची झोपणे आणि उठण्याची सायकल ही नियंत्रित करते.

जर एखादा व्यक्ती नाइट इटिंग सिंड्रोमने पीडित असेल तर त्याच्या शरीरातील बॉयोलॉजिकल क्लॉक व्यवस्थित काम करणार नाही. त्याच्या शरीरात असे हार्मोन रिलीज होऊ लागतात जे दिवसाऐवजी रात्रीच्या वेळी भूक लागण्याचा अनुभव देते. त्याचसोबत काही लोकांमध्ये ही समस्या अनुवांशिक असू शकते. काही वेळेस जर शरीराला पुरेशा प्रमाणात कॅलरीज मिळाल्या नाहीत तर शरीर रात्रीच्या वेळी कॅलरीची डिमांड करते. त्यामुळे आपल्या मेंदू पर्यंत आपल्याला भूक लागलीय असे संकेत दिले जातात.

यापासून असे रहा दूर
-हेल्दी फूड्स खा
-मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या
-दिवसभर अॅक्टिव्ह रहा
-पुरेशी झोप घ्या


हेही वाचा- वजन कमी केल्यानंतर भूक वाढल्यास अशी करा कंट्रोल

- Advertisment -

Manini