Numerology : अत्यंत बुद्धीमान असतात 5, 14, 23 या तारखेला जन्मलेले लोक

Numerology : अत्यंत बुद्धीमान असतात 5, 14, 23 या तारखेला जन्मलेले लोक

ज्याप्रकारे ज्योतिष शास्त्रामध्ये कुंडली पाहून व्यक्तीच्या व्यक्तीमत्त्वाबद्दल आणि आयुष्याबद्दल अंदाज लावला जातो. त्याचप्रमाणे अंकशास्त्रामध्ये व्यक्तीचे भविष्य, गुणांचा अंदाज लावला जातो. अंकशास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीच्या जन्माची तारीख ही त्याचा मूलांक असतो. म्हणजेच जर एखादा व्यक्ती कोणत्याही महिन्यातील 9, 18, 27 या तारखेला जन्मले असतील तर त्यांचा मूलांक (9,1+8=9 , 2+7=9) 9 असतो. अशाप्रकारे 1 ते 9 हे मूलांक असतात. दोन अंकी तारीख असल्यास त्या तारखेची बेरीज केल्यावर जो अंक येतो. तो त्या व्यक्तीचा मूलांक असतो.

आज आम्ही तूम्हाला मूलांक 5 बद्दल सांगणार आहोत. कोणत्याही महिन्यात 5 , 14 , 23 या तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 5 असतो. मूलांक 5 चा स्वामी ग्रह बुध आहे.

मूलांक 5 असणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो?

अंकशास्त्रानुसार, मूलांक 5 लोक स्वभावाने कोमल, हुशार आणि चंचल असतात. हे खूप बुद्धीमान असतात. कोणतेही काम करण्यास नेहमी तत्पर असतात. यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते. हे आपल्या बोलण्याच्या पद्धतीने इतरांना भुरळ पाडतात. शिवाय हे विनोदी देखील असतात. मात्र, यांची मानसिक स्थिती सतत बदलत असते. हे लोक एकाच मनस्थितीत जास्त काळ राहू शकत नाहीत.

मूलांक 5 असणाऱ्या व्यक्तीं सफतलेसाठी करा ‘हे’ उपाय


हेही वाचा :

Numerology : खूपच चतूर असतात 4,13, 22, 31 या तारखेला जन्मलेले लोक

First Published on: March 30, 2023 3:45 PM
Exit mobile version