Nutrition Week 2021: कोरोना महामारीत डोळ्यांच्या समस्या वाढल्या; जाणून घ्या कोणत्या पोषक घटकांची आवश्यकता

Nutrition Week 2021: कोरोना महामारीत डोळ्यांच्या समस्या वाढल्या; जाणून घ्या कोणत्या पोषक घटकांची आवश्यकता

उत्तम आरोग्यासाठी आवश्यक पोषक तत्वांविषयी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी १ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर पर्यंत पोषण सप्ताह साजरा केला जातो. आज या विशेष सप्ताहाचा शेवटचा दिवस आहे. निरोगी आरोग्यासाठी योग्य पोषक घटक असणे आरोग्यासाठी महत्त्वाचे मानले जाते. शरीराच्या इतर भागांप्रमाणे डोळ्यांनाही निरोगी राहण्यासाठी आवश्यक पोषक तत्त्वांची गरज भासते. पौष्टिक आहार डोळ्यांच्या कार्यामध्ये खूप मदत करतो. पौष्टिक आहारातील पोषक घटक डोळ्यांना हानिकारक प्रकाशापासून वाचवता यासह वाढत्या वयामुळे होणाऱ्या आजारांपासून देखील सुरक्षित ठेवतात.

कोरोना महामारीदरम्यान आणि महामारीआल्यानंतर वर्क फ्रॉम होम करणाऱ्या आणि ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. कॉम्प्युटर स्क्रीन समोर सतत बल्याने दृष्टी खराब होते. तसेच कॉम्प्युटर स्क्रीन सतत पाहण्यामुळे डोळ्यांच्या अनेक समस्या उद्भवू शकतात, जसे की कोरडे डोळे, डोळ्यांचा ताण आणि थकवा, अंधुक दृष्टी, डोकेदुखी. शारीरिक हालचालींचा अभाव, खाण्याच्या विचित्र सवयी, वारंवार खाणे हे देखील डोळ्यांच्या समस्यांना कारणीभूत ठरत असल्याचे सीनियर कंसल्टन्ट डॉ. विनीत सहगल यांनी सांगितले.

पोषक घटकांच्या कमतरतेमुळे येऊ शकतात ‘या’ समस्या

डोळ्यांना अनुकूल असणाऱ्या पोषक घटकांपैकी ल्यूटिन आणि झेक्सॅन्थिन, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि झिंक सारख्या घटक डोळ्यांच्या गंभीर आजारांचा धोका कमी करतात, ज्यामध्ये वाढत्या वयाशी संबंधित मॅक्युलर डिजनरेशन आणि मोतीबिंदू यांचा समावेश आहे. व्हिटॅमिन एची कमतरता असलेल्या मुलांना अवॉइडेबल ब्लाइंडनेस तसेच अतिसार आणि गोवर यासारख्या गंभीर आजार आणि मृत्यूचा धोका जास्त असतो. डोळ्याच्या उत्तम आरोग्यासाठी आवश्यक पोषक घटकांमध्ये काही पोषक घटक असे आहे की, हिरव्या पालेभाज्या, फळे आणि सुकामेवा विशेषतः महत्वाचे आहेत. योग्य आहाराव्यतिरिक्त, शारीरिक व्यायाम देखील मोतीबिंदू, कोरडे डोळे, ग्लूकोमा आणि इतर गंभीर रोगांपासून बचाव करण्यासाठी प्रभावी असल्याचे दिसून आले आहे.


First Published on: September 8, 2021 11:45 AM
Exit mobile version