Tuesday, April 30, 2024
घरमानिनीFashionपॅडेड ब्रा धुण्याची ही आहे योग्य पद्धत

पॅडेड ब्रा धुण्याची ही आहे योग्य पद्धत

Subscribe

मार्केट मध्ये तुम्हाला काही प्रकारच्या ब्रा सहज मिळतील. या सर्वांमध्ये पॅडेड ब्रा सर्वाधिक पसंद केली जाते. मात्र यामध्ये काही प्रकार आणि डिझाइन्स ही तुम्हाला पहायला मिळतात. परंतु जेव्हा त्या नक्की कशा प्रकारे धुवायच्या असा प्रश्न येतो तेव्हा बहुतांशजण कंफ्युज होतात. काहीजण अशा ब्रा नॉर्मल ब्रा सोबत धुतात. असे केल्याने पॅडेड ब्रा चे फॅब्रिक खराब होण्याची शक्यता अधिक वाढते. त्या दीर्घकाळ टिकत नाही. अशातच पॅडेड ब्रा नक्की कशी धुवायची याची योग्य पद्धत पाहूयात.

- Advertisement -

-सर्वात प्रथम एका बादलीत पाणी टाका आणि त्यात कमीत कमी एक तास तरी ब्रा भिजवून ठेवा
-यामध्ये तुम्ही वॉशिंग पावडर टाका आणि हातांच्या मदतीने हलक्या स्वरुपात धुवा
-असे तुम्ही जवळजवळ 5 मिनिटांपर्यंत करा, जेणेकरुन ब्रा व्यवस्थिती स्वच्छ होईल
-लक्षात ठेवा हलक्या हाताने ती पिळा
-त्यानंतर ब्रा चे स्ट्रॅप सुद्धा त्याच प्रकारे धुवा

- Advertisement -

‘या’ चुका करणे टाळा
-पॅडेड ब्रा धुण्यासाठी तुम्ही स्ट्राँन्ग केमिकल असणाऱ्या वॉशिंग पावडरचा वापर करणे टाळा
-गरम पाण्याने पॅडेड ब्रा अजिबात धुवू नका
-खुप वेळ पॅडेड ब्रा पाणी किंवा वॉशिंग पावडरमध्ये बुडवून ठेवू नका, अन्यथा फॅब्रिक खराब होऊ शकते.
-पॅडेड ब्रा धुण्यासाटी वॉशिंग मशीनचा वापर करणे टाळा


हेही वाचा- जीन्स किती दिवसांनी धुवावी

- Advertisment -

Manini