रुट कॅनलच्या वेदनांपासून मुक्ती

रुट कॅनलच्या वेदनांपासून मुक्ती

Root Canal Treatment

तुम्ही रुट कॅनलच्या तीव्र वेदनेने त्रस्त आहात का? तुम्ही अनेक उपचार केले, परंतु काहीच फायदा झाला नाही, हो ना… मग तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही. आम्ही तुम्हाला सांगत आहोत रुट कॅनलचा त्रास दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय… चला तर मग पाहूया कोणते उपाय केल्याने रुट कॅनलच्या वेदना दूर होतील.

* बर्फ लावा
हा उपाय अनेक वर्षांपासून वापरला जात आहे. बर्फ दुखणार्‍या जागेवर लावा. याने ती जागा सुन्न होईल आणि त्रास होणार नाही. लक्षात ठेवा १० मिनिटांपेक्षा जास्त वेळ बर्फ ठेवणे घातक ठरू शकते.

* तरल आहार
जेव्हा तुमच्या दातात दुखते तेव्हा तुम्हाला तरल आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. अशात संत्रे आणि गाजराचा ज्यूस पिणे फायदेशीर ठरते. परंतु, ज्युस जास्त गार असू नये.

*मीठ
कोमट पाण्यात एक चमचा मीठ टाकून दिवसातून दोन वेळा पाण्याने गुळण्या करा. पाण्याला थुंकण्या अगोदर दुखणार्‍या जागेवर पाणी थोडावेळ नक्की ठेवा.

*अल्कोहोल
अल्कोहोल असणारे पेय जसे की बीअर किंवा व्हिस्कीने गुळण्या करा हे सुध्दा फायदेशीर असते. यामुळे फक्त इन्फेक्शनच थांबणार नाही तर ती जागा सुन्न होईल आणि वेदना कमी होतील.

*चहाच्या वृक्षाचे तेल
हे तेल पिंपल्स आणि ब्लॅकहेड्स व्यतिरिक्त अनेक इलाजांसाठी फायदेशीर असते. हे तेल रुट कॅनलचे दुखणे कमी करण्यासाठी मदत करते. याचे काही थेंब कोमट पाण्यात मिसळा आणि थोडा वेळ हे पाणी तोंडात ठेवा. वेदना कमी होतील.

*काकडी
काकडीमुळे तुमच्या वेदना कमी होऊ शकतात. ताज्या काकडीचे तुकडे वेदना होणार्‍या जागेवर ठेवा. यामुळे त्या ठिकाणी थंड वाटेल आणि दुखणे कमी होईल.

*ऑलिव्ह ऑईल
कापसाला ऑलिव्ह ऑईलमध्ये भिजवून दुखणार्‍या जागेवर ठेवा. यामुळे दुखण्यापासून आराम मिळेल. ऑलिव्ह ऑईलमध्ये अँटी-इन्फ्लामेटरी तत्त्व असतात जे दुखणे आणि सूज कमी करतात.

*लवंग तेल
लवंगमध्ये अँटी-इन्फ्लामेटरी, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटीसेप्टीक तत्त्व असतात. यामुळे दाताच्या वेदना कमी होतात.

* कांदा-लसुणचे तेल
लसूण एक अँटी-बायोटिक औषधी आहे आणि कांदा एक अँटीसेप्टीक औषधी. कांदा आणि लसूण चावल्यानेही रुट कॅनलच्या वेदना दूर होतात.

*हिंग
हिंग हे रुट कॅनलसाठी एक फायदेशीर औषधी आहे. २ टी स्पून लिंबाच्या रसामध्ये थोडा हिंग मिसळा. हे मिश्रण थोडे गरम करा आणि कापसाने हे दुखर्‍या जागेवर लावा.

First Published on: October 8, 2018 12:58 AM
Exit mobile version