Parenting Tips: मुलांची खेळणी अशा प्रकारे करा स्वच्छ

Parenting Tips: मुलांची खेळणी अशा प्रकारे करा स्वच्छ

लहान मुलांना खेळण्यांनी खेळणे फार आवडते. यामुळे पालकांना ही आनंद होतो. परंतु तुम्ही कधी याकडे लक्ष दिले आहे का, मुलं जेव्हा त्यांची खेळणी तोंडात टाकतात तेव्हा त्यांना लागलेली धुळ, माती त्यांच्या तोंडात जाते. बहुतांश खेळण्यांवर धूळ आणि बॅक्टेरिया जमा होतात. अशातच त्यांची वेळोवेळी स्वच्छता करणे फार गरजेचे असते. अन्यथा तुमचे मुलं आजारी पडू शकते. तर जाणून घेऊयात विविध प्रकारची मुलांची खेळणी कशा प्रकारे स्वच्छ केली पाहिजेत.

-प्लास्टिकची खेळणी


प्लास्टिकची खेळणी ही वजनाने हलकी असल्याने ती मुलांना खेळण्यासाठी पालक आरामात खरेदी करतात. परंतु ती दररोज स्वच्छ करणे हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. ते डिटर्जेंट अथवा साबण लावून स्वच्छ करा. कारण ही खेळणी सपाट नसतात.

-रबराची खेळणी


मुलांना रबराच्या खेळण्यांसोबत खेळणे फार आवडते. परंतु अशा खेळण्यांवर ही किटाणू जमा होतात. त्यामुळे ही खेळणी स्वच्छ केली पाहिजेत. सर्वात प्रथम ही खेळणी बादलीत पाणी घेऊन त्यात ठेवा. त्यानंतर त्यावर लिक्विड सोप आणि व्हाइट विनेगर टाका. थोड्यावेळ्याने ब्रश आणि पाण्याच्या मदतीने खेळणी स्वच्छ करा.

-लाकडाची खेळणी


लाकडाची खेळणी तुम्ही पाण्याने तर स्वच्छ करु शकत नाहीत. कारण तसे केल्यास ती लवकर घराब होऊ शकतात. त्यामुळे एका भांड्यात पाणी आणि व्हाइट विनेगर मिक्स करा. आता सुती कापडाने किंवा कापसाच्या मदतीने ती स्वच्छ करा.

 


हेही वाचा: परिक्षेदरम्यान मुलांची कशी घ्याल काळजी?

First Published on: April 15, 2023 11:52 AM
Exit mobile version