पालक मुलांना वेळ देऊ शकत नाही; हे वाचा

पालक मुलांना वेळ देऊ शकत नाही; हे वाचा

पालक मुलांना वेळ देऊ शकत नाही; हे वाचा

सध्याच्या परिस्थितीत घरातील बरेच आई – वडिल नोकरीकरता बाहेर पडतात. त्यामुळे त्यांना या स्पर्धेच्या युगात स्वत:साठीही वेळ देणे कठीण होते. त्यातच घरात लहान मुले असतील तर त्यांना देखील पुरेसा वेळ देता येत नाही. परंतु, प्रत्येक आई – वडिलांना आपल्या मुलांसह वेळ घालवायचा असतो. मात्र, काही केल्या ते शक्य होत नाही. पण, जर तुम्ही या गोष्टी केल्यात तर पालकांना आपल्या मुलांसोबत वेळ घालवणे सहज शक्य होईल.

मोबाईलपासून दूर रहा

दररोजच्या कामात घरी आल्यानंतर थोडासा वेळ मिळतो. मात्र, त्यावेळी देखील आपण मोबाईल घेऊन बसतो. तसेच करु नका. घरी आल्यानंतर मोबाईल दूर ठेवा आणि मुलांना दिवसभर काय काय केले याची विचारपूस करा. त्यामुळे मुलांनी दिवसभर काय केले ते तुमच्याकडे मनमोकळेपणाने सांगू शकतील.

शॉपिंग टाळा

बऱ्याचदा सुट्टीच्यावेळी शॉपिंगकरता बाहेर जाणे होते. मात्र, जर खरचं शॉपिंगची आवश्यकता असल्यास बाहेर पडा. अन्यथा तो वेळ तुमच्या मुलांसोबत गप्पा मारण्यात घालवा.

तुम्हीही लहान व्हा

मुलांनसोबत असताना तुम्हीही लहान व्हा. त्यांच्यासोबत तुम्हीही खेळा. त्यामुळे मुले खुश राहून तुमच्यासाठी अधिक खुलेपणाने राहू शकतील.

सोशल साइट्सवर कमी वेळ द्या

आजकालच्या जगात लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच जण सोशल मीडियाचा वापर करतात. सातत्याने फेसबुक, इन्स्टाग्राम, Whatsapp सारख्या सोशल साइट्सवर Active असतात. त्यामुळे मुलांना कमी वेळ दिला जातो. सोशल साइट्सपेक्षा मुलांसोबत खेळा, त्यांच्यासोबत फिरायला जा, त्यामुळे तुम्हाला अधिकाधिक वेळ मुलांसोबत मिळू शकतो.

व्यायाम करा

तुम्ही जर दररोज व्यायाम करत असाल तर त्यात तुमच्या मुलांना देखील सामिल करा. त्यांनाही तुमच्यासोबत मॉर्निंग वॉकसाठी बाहेर घेऊन जा. त्यामुळे त्यांनाही चांगल्या सवयी लागून आरोग्यही उत्तम राखण्यास मदत होईल. त्यासोबतच तुम्ही एकमेकांसोबत अधिक वेळ घालवू शकाल.

First Published on: February 15, 2020 6:00 AM
Exit mobile version