सांधेदुखी असणाऱ्यांनी चुकूनही करू नयेत ही योगासने

सांधेदुखी असणाऱ्यांनी चुकूनही करू नयेत ही योगासने

हल्ली वयोवृद्धच नाही तर तरुणांमध्येही एक आजार झपाट्याने वाढत आहे तो म्हणजे सांधेदुखीचा. अशावेळी तुम्हाला काही योगासनांचा सराव फायदेशीर ठरतो. सर्वसाधारणपणे योगाचा प्रत्येक व्यक्तीला फायदा होतो आणि योगासनांच्या सरावामुळे आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात. पण म्हणून तुम्ही कोणतेही आसन तुमच्या बॉडी स्ट्रक्चर आणि तुमचा त्रास लक्षात न घेता केल्यास त्याच्या तुमच्या आरोग्यावर उलटा परिणाम होऊ शकतो. यासाठी कोणतेही आसन करताना योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.

डीप बॅकएंड मुद्रा –
या आसनाचा पचनसंस्थेवर खूप चांगला परिणाम होत असला तरी सांधेदुखीचा त्रास असणाऱ्या व्यक्तीने चक्रासन किंवा उष्टासनसारखी आसने करू नयेत. अशा आसनांमुळे मणक्यावर आणि सांध्यावर अतिरिक्त प्रेशर येते. विशेषतः पाठीच्या खालच्या भागावर, नितंबावर आणि खांद्यावर जास्त प्रेशर येऊ शकतो, त्यामुळे सांधेदुखीचा त्रास असणाऱ्या व्यक्तीने ही आसने टाळावीत.

डीप बॅकफॉरवर्ड पोश्च्रर –
सांधेदुखीचा त्रास असेल तर डीपबॅक फॉरवर्ड पोश्च्रर टाळावे. उत्तानासन किंवा पश्चिमोत्तासनसारखी आसने केल्यास पाठीच्या खालच्या भागावर किंवा हॅमस्ट्रिंगवर खूप जास्त प्रेशर येते. ज्यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या उदभवू शकतात. ही आसने करताना जर तुमची बॉडी अलाइनमेंट योग्य नसेल तर यामुळे सांध्यातील वेदना अनेक पटींनी वाढू शकते.

डीप स्क्वाट्स पोश्चर –
अशी अनेक आसने आहेत ज्यात शरीर डीप स्क्वाट्स पोश्चर स्थितीत राहते. पण जर तुम्हाला सांधेदुखीचा त्रास असेल तर त्याने मलासन किंवा उत्कटासनसारखी आसने करणे टाळावे. अशा आसनांमुळे गुडघे आणि नितंबावर खूप जास्त प्रेशर येते. ज्यामुळे सांधेदुखी आणखीनच वाढू शकते.

 

 

 

 

 


हेही पहा : Yogasane : एक सूर्यनमस्कार १२ योगासनांच्या बरोबरीचा

First Published on: April 8, 2024 5:53 PM
Exit mobile version