Tuesday, May 14, 2024
घरमानिनीRecipeRava Cake : साध्या-सोप्प्या पद्धतीने तयार करा रवा केक

Rava Cake : साध्या-सोप्प्या पद्धतीने तयार करा रवा केक

Subscribe

लहान मुलं केक खूप आवडीने खातात, मात्र सतत बाजारातील केक खाणं आरोग्यासाठी घातक ठरु शकतं. अशावेळी तुम्ही घरच्या घरी साध्या-सोप्प्या पद्धतीने रवा केक नक्की ट्राय करु शकता.

साहित्य :

  • 1 वाटी रवा
  • 1 वाटी दही
  • 1 वाटी दूध
  • 1 वाटी साखर
  • 1-2 चमचे तूप
  • 1 चिमूट बेकिंग सोडा
  • वेलचीपूड आणि दालचिनी पावडर
  • सुकामेवा

कृती :

Healthy Kadai: Rava Cake Recipe in Pressure Cooker

- Advertisement -

 

 

  • सर्वप्रथम रवा, दही, दूध, साखर, तूप एकत्र करून हे मिश्रण 15 ते 20 मिनीटे फेटून घ्यावे. साखर व्यवस्थित विरघळेल याची काळजी घ्यावी आणि मिश्रण 2-3 तास झाकून ठेवावे.
  • त्यानंतर 1 चमचा पाण्यात चिमटभर बेकिंग सोडा घालावा आणि मिक्स करून फेटलेल्या मिश्रणात बेकींग सोडाचे मिश्रण घालून घ्यावे.
  • आता गॅसवर एक जाड बुडाचा तवा तापत ठेवावा.
  • त्यावर डबा ठेऊन मंद आचेवर केक शिजू द्यावा. केक झाल्याचा वास आल्यावर गॅस बंद करावा.
  • झाकण लगेच उघडू नये. 15 किंवा 20 मिनिटांनी उघडावं.
  • केक बाहेर काढून सर्वांना सर्व्ह करावे.

हेही वाचा :

Recipe : चटपटीत आलू चाट

- Advertisment -

Manini