चटपटीत पदार्थ सर्वांनाच खायला आवडतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी आलू चाट कसा बनवायचा हे सांगणार आहोत.
साहित्य :
- 4-5 उकडलेले बटाटे
- हिरवी कोथिंबीर
- 4-5 हिरव्या मिरच्या
- काळं मिठ चवीनुसार
- लिंबाचा रस
- जिरा पावडर
- चाट मसाला
- लाल मिरची पावडर
- कांदा
- चिंचेचा रस
कृती :
- सर्वप्रथम कोथिंबीरीमध्ये हिरवी मिरची, काळं मीठ घालून वाटण करुन घ्या.
- यानंतर गरम पाण्यात वाफवलेले बटाटे तेलामध्ये तळून घ्या.
- बटाट्यांना लालसर होईपर्यंत तळा आणि मग एका बाऊलमध्ये काढून घ्या.
- आता या तळलेल्या बटाट्यांमध्ये काळं मीठ, जिरे पावडर, चाट मसाला आणि लाल मिरची पावडर टाका.
- नंतर त्यामध्ये कापलेला कांदा आणि अर्ध्या लिंबाचा रस, हिरवी चटणी त्यामध्ये टाकूम हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करा.
- आता हे मिश्रण एका बाऊलमध्ये काढून त्यावर चिरलेला कांदा, टोमॅटो, बारीक शेव टाकून सर्व्ह करा.
हेही वाचा :