Monday, April 29, 2024
घरमानिनीKitchenMakar Sankranti 2024 :उत्तराखंड ते केरळपर्यंत बनविले जातात मकरसंक्रांतीसाठी 'हे' खास पदार्थ

Makar Sankranti 2024 :उत्तराखंड ते केरळपर्यंत बनविले जातात मकरसंक्रांतीसाठी ‘हे’ खास पदार्थ

Subscribe

वर्षाच्या सुरुवातीचा सण म्हणजे मकर संक्राती. हा सण कापणीच्या हंगामाची सुरुवात करतो आणि मकर संक्रातीनंतर दिवस मोठे होऊ लागतात. असे म्हणतात की सूर्य उत्तरेकडे सरकतो आणि मकर राशीत प्रवेश करतो. या दिवशी पतंग उडवून विविध खाद्यपदार्थ बनवून हा सण साजरा करण्यात येतो. आपला देश हा विविधतेने नटलेला असून विविध खाद्यपदार्थांची परंपरा आपल्याला लाभलेली आहे. त्यानुसार मकर संक्रातीच्या दिवशी विविध राज्यात वेगवेगळे पदार्थ बनवून हा सण साजरा करण्यात येतो.

Makar Sankranti 2024 Ravi Yog Is Being Formed On This Day Kharmas Will End - Makar Sankranti 2024: सूर्य के राशि परिवर्तन के साथ ही मकर संक्रांति पर बन रहा है ये

- Advertisement -

तिळाचे लाडू
महाराष्ट्रात मकर संक्रातीच्या दिवशी तिळाचे लाडू खाण्यात येतात. तिळाचे लाडू हे तीळ आणि गुळापासून बनविण्यात येतात. हे केवळ चवीलाच चांगले नसतात तर शरीरात उबदारपणा देण्यासही मदत करतात.

तलेर बोरा
बंगाली लोक त्यांच्या पौष संक्रातीचे स्वागत पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या भव्य सागर मेळाव्याने करतात. या वेळी तांदळापासून बनवलेले पदार्थ हे पूजेत देवांना प्रसाद म्हणून अर्पण करण्यात येतात. बंगालमध्येही संक्रातीच्या दिवशी अनेक गोड पदार्थ तयार करण्यात येतात. पतीशप्त ते गोजा आणि यापैकी एक म्हणजे तलेर बोरा. याचे दुसरं नाव म्हणजे तलेर फ़ुलुरी असे देखील म्हणतात. गव्हाचे पीठ, तांदूळ आणि रवा यांपासून हा पदार्थ बनविण्यात येतो.

- Advertisement -

उंधियो
मकर संक्रातीच्या दिवशी गुजरात राज्यात उंधियो बनविण्यात येतो. बटाटे, वांगी, फरसबी, रताळी आणि कच्ची केळी यांसारख्या भाज्या एकत्र करून उंधियो बनविण्यात येतो. उंधियो म्हणजे उलटे शिजवलेले पदार्थ. हा पदार्थ मातीच्या भांड्यात उलटा बनविण्यात येतो.

पिट्ठा
झारखंड मध्ये विशेष करून तिळाची बर्फी बनविण्यात येते. यासोबत पिट्ठा हा फराळ म्हणून दिला जातो. असे बोलले जाते की, पिट्ठा सर्वात पहिले पश्चिम बंगालमध्ये बनविण्यात आले होते नंतर ते झारखंडचे व्यंजन बनले.

मकर चौला
मकर चौला हा ओडिशात खूप लोकप्रिय पदार्थ आहे. तांदळाच्या पिकासह गूळ, दूध, केळी आणि ऊस वापरून मकर चौला बनविण्यात येतो.

घुघुटी
उत्तराखंडमधील कुमाऊंनी भागात हा सण अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात येतो. इथे मकर संक्रातीला ‘घुघुटी’ असे म्हणतात. गव्हाचे पीठ आणि गूळ एकत्र फेटून पिठाला फुले यासारखी वेगवेगळी आकार देण्यात येतात. त्यानंतर ते तुपात तळले जातात. स्थलांतरित पक्षांच्या स्वागताचे प्रतीक म्हणून लहान मुले या माळा घालतात.

कांगसुबी
या दिवशी जम्मू-काश्मीरमध्ये तरुणाई ‘छज्जा’ नावाचे पारंपरिक नृत्य करतात. या उत्सवादरम्यान रंगेबेरंगी कागद, फुलांनी घरे सजविण्यात येतात. इतर ठिकाणांप्रमाणेच दही चुरा, गूळ, कांगसुबी असे विविध पदार्थ या दिवशी बनविले जातात.

 


हेही वाचा ; तुळशीच्या कुंडीवर काढा ‘ही’ शुभ चिन्हं; होतील अनेक फायदे

- Advertisment -

Manini