Friday, April 26, 2024
घरमानिनीKitchenReceipe : टेस्टी पनीर समोसा नक्की ट्राय करा

Receipe : टेस्टी पनीर समोसा नक्की ट्राय करा

Subscribe

आपल्यापैकी अनेकांना समोसा खायला खूप आवडतो. मात्र प्रत्येकवेळी आपण बटाट्याचा समोसा खातो, पण या वेळी तुम्ही चविष्ट आणि पौष्टिक असा पनीर समोसा नक्की ट्राय करा.

साहित्य :

  • 125 ग्रॅम पनीर (बारीक चिरलेले)
  • 1/2 कांदा (बारीक चिरलेला)
  • 1 हिरवी मिरची (बारीक चिरलेली)
  • 1/2 चमचा लाल तिखट
  • 1/2 चमचा लिंबाचा रस
  • 1 कप मैदा
  • 1/4 चमचा जिरे
  • बटर
  • मीठ चवीनुसार
  • तेल आवश्यकतेनुसार

कृती :

पॉप्युलर स्ट्रीट स्नैक्स: पनीर चिली समोसा (Popular Street Snack: Paneer Chilli Samosa)

  • सर्वप्रथम एक भांड्यात मैदा, बटर आणि मीठ, पाणी घालून एकत्र करून पीठ घट्ट मळून घ्या.
  • हे पीठ मळून झाल्यानंतर ओल्या सुती कापडाने ते झाकूण ठेवा.
  • आता एका कढईत मध्यम आचेवर थोडे तेल गरम करा. आता त्यात सुरूवातीला जिरे,कांदा, हिरव्या मिरच्या घालून परतून घ्या.
  • आता त्यामध्ये लाल तिखट, मीठ आणि पनीर घाला. हे सर्व मिश्रण चांगले एकजीव करून एक मिनिट शिजू घ्या. त्यानंतर गॅस बंद करा.
  • एकीकडे कणकेची बारीक पुरी लाटून घ्या आणि त्या पुरीचे मधून दोन भाग करा.
  • या अर्ध्या भागात तयार सारण भरून त्याला समोश्यासारखा आकार द्या आणि हे तेलात खरपूस तळून घ्या.
  • पनीर समोसा पुदीण्याची चटणी किंवा टोमॅटो सोबत गरमागरम सर्व्ह करा.

हेही वाचा :

Recipe : चटपटीत आणि पौष्टिक मूग डाळीचा डोसा

- Advertisment -

Manini