Monday, April 29, 2024
घरमानिनीReligiousवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

मग जाती व्यक्ती पडे बिंदुलें । जेव्हां भावें होती मज मीनले । जैसे लवणकण घातले । सागरामाजीं ॥
ज्याप्रमाणे समुद्रात मीठ घातल्यावर एकरूप होऊन जाते, त्याप्रमाणे मनोभावाने मला शरण आल्यावर जाती, व्यक्ती वगैरे भेद नाहीसा होतो.
तंववरी नदानदींचीं नांवें । तंवचि पूर्वपश्चिमेचे यावे । जंव न येती आघवे । समुद्रामाजीं ॥
जोपर्यंत समुद्राला येऊन मिळाले नाहीत, तोपर्यंत नद, नदी, पूर्ववाहिनी, पश्चिमवाहिनी वगैरे भेद असतो.
हेंचि कवणें एके मिसें । चित्त माझे ठायीं प्रवेशे । येतुलें हो मग आपैसें । मीचि होणें असे ॥
त्याचप्रमाणे कोणत्याही निमित्ताने माझ्याकडे चित्त लागले म्हणजे पुरे, मग सहजच मद्रूपत्व प्राप्त होते.
अगा वरी फोडावया लागीं । लोहो मिळो कां परिसाचे आंगीं । कां जे मिळतिये प्रसंगीं । सोनेंचि होईल ॥
अरे, परिसाला फोडण्याकरिता का होईना, जरी लोखंडाने स्पर्श केला तरी स्पर्शाबरोबर त्याचे लागलीच सोने होते.
पाहें पां वालभाचेनि व्याजें । तिया व्रजांगनांचीं निजें । मज मीनलिया काय माझें । स्वरूप नव्हती? ॥
हे पाहा, गोपींनी विषयाच्या प्रीतीने माझे ठिकाणी आपले चित्त ठेवल्यामुळे त्या मद्रूप झाल्या नाहीत का?
नातरी भयाचेनि मिसें । मातें न पविजेचि काय कंसें? । कीं अखंड वैरवशें । चैद्यादिकीं ॥
किंवा भीतीच्या योगाने कंस मद्रूप झाला नाही का? किंवा माझ्याशी अखंड वैर केल्याने शिशुपालादिक मद्रूप झाले नाहीत का?
अगा सोयरेपणेंचि पांडवा । माझें सायुज्य यादवां । कीं ममत्वें वसुदेवादिकां । सकळां ॥
अरे, तसेच पांडव व यादव यांस सोयरिकीच्या नात्याने व वसुदेवादिक यांना ममत्वाने माझे सायुज्य मिळाले नाही का ?

- Advertisment -

Manini