असे बनवा घरच्या घरीच मंच्युरियन

असे बनवा घरच्या घरीच मंच्युरियन

Manchurian

आजकाल चायनिज पदार्थ हे लहानांसोबतच मोठ्यांचे सुद्धा सगळ्यात आवडते पदार्थ झालेत. पण हेच पदार्थ जर तुम्ही घरी बनवलेत तर त्याच्या स्वादा सोबतच तुमचे आरोग्याही जपले जाईल.

साहित्य
कोबी- मध्यम आकाराचे कापलेले,
सिमला मिर्ची – १ मध्यम आकारात कापलेला
गाजर- १ मध्यम आकारात कापलेला
कांदे – २ मध्यम आकारात कापलेला
हिरवी मिर्ची – चविनुसार
कॉर्न फ्लोवर पावडर – १ वाटी
टोमॅटो सॉस – १ वाटी
चिली सॉस- १ वाटी
सोया सॉस – १ वाटी

कृती 
*कोबी हलकासा उकळून घ्यावा.
*त्यात कॉर्न फ्लोवर, सोया सॉस, चीली सॉस, टोमॅटो सॉस आणि मीठ टाकून बाजूला मिक्स करुन ठेवावे.
*एका पॅनमध्ये तोडे तेल टाकून त्यावर आले लसून पेस्ट, कापलेला कांदा, हिरवी मिर्ची, गाजर, सिमला मिर्ची परतून घ्यावी.
*नंतर चीली सॉस, सोया सॉस आणि टोमॅटो सॉस टाकून हलवून घ्यावे.
* आता त्यात कॉर्नफ्लोअर मध्ये मिक्स करुन ठेवलेला कोबी घालावा.
* थोडे पाणी मिक्स टाकून कोबी शिजू द्यावी.
* कोबी निट शिजला की, मंच्युरियन मसाला टाकावा. ग्रेव्ही थोडी घट्ट झाली की, गॅसवरुन उतरवून घ्यावी.
* पातीच्या कांद्याने गार्निश करुन गरमा गरम सर्व्ह करावी.

(टिप – ड्राय गोबी मंच्युरियन बनवायचा असल्यास, कोबीचे तुकडे कॉर्न फ्लोअरच्या पेस्टमध्ये बुडवून तळून घ्यावे. तसेच सर्व सॉसच्या मिश्रणामध्ये मिक्स करुन सर्व्ह करावे. )

First Published on: January 8, 2019 5:53 AM
Exit mobile version