Friday, May 17, 2024
घरमानिनीफ्रिजमधल्या अन्नालाही असते एक्सपायरी डेट

फ्रिजमधल्या अन्नालाही असते एक्सपायरी डेट

Subscribe

फ्रिज जवळपास सर्वांचाच स्वयंपाकघरात असतो. स्वयंपाक घरात बनवलेल्या अन्नाची शेल्फ लाइफ वाढविण्यासाठी फ्रिजचा वापर केला जातो. साधारणतः अंडी, भाज्या, फळे, दुग्धजन्य पदार्थ, आईस्क्रीम, यासारखे पदार्थ फ्रिजमध्ये साठवले जातात. फ्रिजचा वापर तेव्हाच जास्त होतो जेव्हा अन्न शिल्लक राहते. पण, फ्रिजमध्ये ठेवलेले अन्न किती वेळ योग्यस्थितीत असते. त्यातील पौष्टीकता किती काळ टिकते. फ्रीजमधल्या अन्नाचीही एक्सपायरी डेट असते हे तुम्हाला ठाऊक आहे का ?

फ्रीजमधल्या अन्नालाही एक्सपायरी डेट असते. एक्सपायरी डेट संपलेले अर्थात श्लेफ लाइफ संपलेले अन्नपदार्थ खाल्याने अपचन, पोटदुखी, अन्नातून विषबाधा होण्याची शक्यता असते. जाणून घेऊयात कोणत्या पदार्थाची एक्सपायरी डेट काय असते.

- Advertisement -

फ्रिजमधल्या अन्नाची एक्सपायरी

भात दोन दिवसांपेक्षा जास्त ठेऊ नका –

भात बराच काळ उघडा ठेवल्यास त्यामध्ये बोट्युलिझम नावाच्या बॅक्टरीयाचा धोका वाढतो. ज्यामुळे अपचन, पोटदुखीसारख्या समस्या उदभवतात. फ्रिजमध्ये ठेवलेला भात दोन दिवसातच खावा. खाण्यापूर्वी, भात खोलीच्या तापमानावर काही काळ ठेवा. त्यानंतरच तो खाणे योग्य असते. आणखी एक गोष्ट, भात गरम केल्यानंतर तो पुन्हा फ्रिजमध्ये ठेऊ नका.

पोळी 8 तासांच्या आतच खावी –

साधारणतः पोळ्या नेहमी जास्त बनविल्या जातात. त्यामुळे उरलेल्या पोळ्या दुसऱ्या दिवशी खाल्या जातात. पण, डॉक्टरांच्या मते, पोळ्यांमध्ये बुरशीजन्य घटक निर्माण होतात. त्यामुळे पोळी ही तयार झाल्यावर 7 ते 8 तासांच्या आतच खावी.

- Advertisement -

शिजवलेल्या भाज्या –

शिजवलेल्या भाज्या कमीतकमी आठवडाभर फ्रिजमध्ये ठेवता येतात. भाज्यांचा ताजेपणा टिकवून ठेवण्यासाठी त्या झाकून साठवून ठेवा. पण असे करताना या भाज्या उत्तम क्वालिटीच्या तेलात तयार केलेल्या असाव्यात.

शिजवलेले नॉनव्हेग –

शिजवलेले मांस किंवा फिश करी 3 ते 4 दिवस फ्रिजमध्ये ठेवता येते. पण याआधी ते योग्यरीत्या गरम करून त्यानंतर थंड झाल्यावरच साठवून ठेवाव्यात.

दुग्धजन्य पदार्थ –

डेझर्ट, मिठाई आणि पुडिंग सारख्या दुग्धजन्य पदार्थांपासून बनवलेले पदार्थ 2 ते 3 दिवसतच खावेत. जास्त काळ फ्रिजमध्ये साठवून ठेवू नये.

डाळी –

शिजवलेली डाळ केवळ एक दिवसच फ्रिजमध्ये ठेवावी. यापेक्षा जास्त दिवस फ्रिजमध्ये ठेवलेली डाळ खाल्यास
पोटदुखी, अपचन किंवा आम्लपित्ताचा त्रास होऊ शकतो.

फळे –

साधारणपणे 4 ते 5 आठवडे फ्रिजमध्ये फळे ठेवली जातात. फळे जोपर्यंत काळी पडत नाही तोपर्यत आपण ती फ्रिजमध्ये ठेवतो. पण, या फळांचीही एक्सपायरी असते, हे आपल्याला माहित असायला हवे.

सफरचंद – 4 ते 6 आठवडे

ब्लकबेरी, स्ट्रॉबेरी – 3 ते 6 दिवस

आंबटवर्गीय फळे – 1 ते 3 आठवडे

कलिंगड – 2 आठवडे

अननस – 5 ते 7 दिवस

नासपती – 3 ते 5 दिवस

 


हेही पाहा : उन्हाळ्यात दूध नासू नये म्हणून करा हे सोपे उपाय

Edited By – Chaitali Shinde

- Advertisment -

Manini