घरआतल्या बातम्याचांदवड येथील राहुड घाटात बस-ट्रकचा भीषण अपघात

चांदवड येथील राहुड घाटात बस-ट्रकचा भीषण अपघात

Subscribe

चांदवड येथील राहुड घाटात बस-ट्रकचा भीषण अपघात
6 जण दगावले, अनेकजण जखमी,

नाशिक । मुंबई आग्रा महामार्गावरील चांदवड येतील राहुड घाटात एसटी बस आणि ट्रकचा आज सकाळी 9 ते 9.30 दरम्यान समोरासमोर अपघात झाला. या अपघातात 5 ते 6 प्रवाशी दगावल्याची तर अनेकजण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. बसचे टायर फुटून अपघात झाल्याचे समजते.
अपघाताचे वृत्त समजताच पोलीस तातडीने घटनास्थळी रवाना झाले असून जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात येत आहे.

- Advertisement -

चांदवड उपजिल्हा रुग्णालय फक्त मलमपट्टीसाठीच ?
चांदवड येथे श्री रेणुका देवीच्या माथा येथे बस ओव्हरटेक करत असताना ट्रक वाला उजव्या बाजूला वळत होता. एके साईटला डिव्हायडर व दुसर्‍या साईटला ट्रक असल्याने बस डाव्या साईटने ट्रकच्या उजव्या साईटला घसरल्याने हा अपघात झाला आहे. साधारणता 50 व्यक्ती बसने प्रवास करत होते त्यापैकी 35 व्यक्तींना दुखापत झाली आहे यापैकी आठ ते नऊ लोकांना गंभीर दुखापत असून चार व्यक्ती मयत झाल्या आहे. अजूनही तीन व्यक्ती यांची परिस्थिती अधिक गंभीर असल्याचे समजते

कर्मचारी हजर नाही; ट्रामा केअर केवळ नावापुरतीच
उपजिल्हा रुग्णालय येथे ट्रामा केअर व इतर सुख सुविधा या फक्त इमारतीच्या नावाने उभ्या दिसतात. बराचसा कर्मचारी वर्ग हा वेळेवरती उपस्थित नसल्याने अपघातानंतरच बचाव कार्यासाठी चांदवड शहरातील बरेच खाजगी डॉक्टर मदतीसाठी धावून आले. चांदवड उपजिल्हा रुग्णालय देखील तालुक्याचे मुख्य रुग्णालय आहे. त्याचप्रमाणे मुंबई आग्रा महामार्ग तीन व रस्त्यांचे जाळे तसेच तालुक्याची मुख्य बाजारपेठ असल्याने या ठिकाणी वारंवार अपघात होत असतात. अशावेळी या उपजिल्हा रुग्णालयामध्ये डॉक्टर्स वेळेवर उपलब्ध राहत नाही यामुळे नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.

- Advertisement -

उपजिल्हा रुग्णालयात रुग्णवाहिकाच नाही
उपजिल्हा रुग्णालयात रुग्णवाहिकेची गरज असूनसुध्दा रुग्णवाहिका नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आली. यामागील कारणांचा शोध घेतला असता रुग्णवाहिकेच्या दोन चालकांमध्ये झालेला वाद हे कारण समोर आले आहे. यामुळे रुग्णाला हलविण्यासाठी वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होउ शकली नाही. वास्तविक आपआपसांतील मतभेद, वाद बाजूला ठेवून आरोग्य कर्मचार्‍यांनी रुग्णांना सेवा देणे अत्यावश्यक आहे. याकडे अधिकारी वर्गाने बघायला हवे.

रुग्णालयातील डायलिसीस मशीन 5 वर्षांपासून बंद
डायलेसिस मशीन हे गेल्या पाच वर्षापासून उपजिल्हा रुग्णालयाला भूषण कासलीवाल यांच्या मागणीनुसार व गिरीष महाजन यांच्या सहकार्याने उपलब्ध करून दिले होते परंतु ते अद्यापही कर्मचारी वर्गाच्या अपूर्णतेमुळे बंद अवस्थेत आहे याकडे देखील कोणी लक्ष दिलेले नाही असे निदर्शनास आले. कर्मचारी व अधिकारी वारंवार ‘आम्ही पाठपुरावा करत आहोत आम्ही शासनास कळवत आहोत’ असे उत्तर देऊन मोकळे होतात परंतु यामागचे खरे काय कारण आहे हे शोधणे गरजेचे झाले आहे

उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरची व्यवस्था नाही.
आज घडलेल्या भयानक अपघातामध्ये उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी एकही अपघाती व्यक्तीस ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटर ची व्यवस्था उपलब्ध नव्हती कोणत्याही व्यक्तीला ऑक्सिजन दिलेला नाही अशा परिस्थितीत हे उपजिल्हा रुग्णालय फक्त मलमपट्टीसाठीच आहे असे निदर्शनास आले.

अपघाताच्या वेळी उपजिल्हा रुग्णालयात हजर नसलेल्या आरोग्य कर्मचार्‍यांवर तत्काळ कारवाई केली जाईल, याअगोदर मी दोन वेळा उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली मात्र काही कर्मचारी गैरहजर होते, अशावेळी त्यांच्या पगारातही कपात करण्यात आली मात्र तरीही त्यांच्या वागणुकीत फरक पडलेला दिसत नाही. आता त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला पाठविण्यात येईल.
– चारुदत्त शिंदे, जिल्हा शल्य चिकीत्सक, जिल्हा रुग्णालय, नाशिक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -