घरलाईफस्टाईलExpiry Date : एक्सपायरी डेटनंतर हे पदार्थ वापरू नयेत

Expiry Date : एक्सपायरी डेटनंतर हे पदार्थ वापरू नयेत

Subscribe

पॅकबंद असलेल्या प्रत्येक पदार्थांना एक्सपायरी डेट असते. त्यातही प्रामुख्याने किचनमध्ये वापरण्यात येणाऱ्या वस्तू किंवा पदार्थ हे दिर्घकाळ टिकणारे नसतात. त्यामुळे ते वेळच्या वेळी वापरावे लागतात. पण किचनमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्या एकदा दोनदा वापरल्यानंतर अनेक महिने वापरल्या जात नाहीत. जास्त वेळ पडून राहिल्याने त्या खराब होतात. पण बऱ्याचवेळा आपल्या लक्षात ते येत नाही. मग जेव्हा गरज असते तेव्हा आपण त्या वस्तू , पदार्थ शोधायला लागतो. नंतर लक्षात येत की त्याची एक्स्पायरी डेट केव्हाच उलटली आहे. मग एकतर तो पदार्थ आपण थेट कचऱ्याच्या डब्यात फेकून देतो. त्यांचा वापर करत राहतात आणि अशा परिस्थितीत आपल्या आरोग्याला खूप त्रास होऊ शकतो. त्यामुळे कोणकोणत्या गोष्टी त्यांच्या एक्सपायरी डेटनंतर वापरू नये हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे आणि आज आम्ही तुम्हाला त्यांच्याबद्दल सांगणार आहोत.

कॉफी

एक्स्पायरी डेटनंतरही कॉफी वापरू नये. कारण प्री-ब्रीड कॉफीचे मिश्रण कोरडे करून झटपट कॉफी तयार केली जाते. त्यानंतर ही कॉफी पावडरच्या स्वरूपात गरम हवेतून तयार केली जाते. याशिवाय, कधीकधी कॉफी एकतर वाळवली जाते किंवा व्हॅक्यूमद्वारे गोठविली जाते.

- Advertisement -

कॉर्न फ्लॉर

कॉर्न फ्लॉरचा वापर घरी अनेक प्रकारच्या पदार्थांमध्ये केला जातो. ग्रेव्ही ,सॉस बनवणे, सूपमध्ये कॉर्न फ्लॉर वापरले जाते. कॉर्न फ्लॉर बरेच दिवस टिकते. पण जर त्याचा पाण्याशी किंवा हवेशी थेट संबंध आला तर ते खराब होते.

सोया सॉस

सोया सॉसचा वापर अनेक प्रकारच्या पदार्थांमध्ये, विशेषतः चायनीज पदार्थांमध्ये केला जातो. सोया सॉस टिकतेही बरेचदिवस. पण तेही काही दिवसांनी खराब होते.

- Advertisement -

व्हिनेगर

व्हिनेगरचा वापर अनेक घरगुती कारणांसाठी केला जाऊ शकतो. मीठाप्रमाणेच व्हिनेगरचा वापर अनेक खाद्यपदार्थ साठवण्यासाठी केला जातो. व्हाईट व्हिनेगर, ऍपल सायडर व्हिनेगर, राइस व्हिनेगर आणि इतर अनेक प्रकारचे व्हिनेगर वर्षानुवर्षे टिकू शकतात. हे रेफ्रिजरेटरशिवाय देखील ठेवता येतात.

मीठ

अन्नामध्ये वापरली जाणारी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मीठ जे कधीही खराब होत नाही. लोणची, चटण्या आणि कोरडे स्नॅक्स जतन करण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. तथापि, हे केवळ तेव्हाच शक्य आहे जेव्हा मीठ आयोडीन किंवा इतर पदार्थांमध्ये मिसळले जात नाही. कारण असे झाल्यावर मिठाचे नैसर्गिक गुणधर्म बदलू शकतात.

____________________________________________________
Edited By : Nikita shinde

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -