तुमचा पार्टनर पण इमोशनल चिटींग करतो का? कसे ओळखाल!

तुमचा पार्टनर पण इमोशनल चिटींग करतो का? कसे ओळखाल!

तुमचा पार्टनर पण इमोशनल चिटींग करतो का..कसे ओळखाल

नात्यात असतानाही काही लोकांना एकटं वाटत असतं. जास्तीत जास्त वेळ एकत्र घालविल्यानंतर  जेव्हा आपला जोडीदाराच्या भावना प्रदर्शित करणं बंद करतात. तेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते. याचे कारण असे आहे की जेव्हा तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. तेव्हा तुम्हाला जोडीदाराबरोबर असूनही एकटं वाटायला लागतं. असं देखील असू शकते की आपण आपल्या जोडीदाराला समजून घेण्यात चूक केली असेल, किंवा तो आपल्या भावनांशी खेळत असेल. पण या चार गोष्टींवरून तुम्हाला समजू शकते की तुमचा पार्टनर तुमची फसवणूक तर करत नाहीये ना.

तिसऱ्या व्यक्तीवरून भांडण करणे

कोणताही संबंध प्रस्थापित करण्यासाठी एकमेकांना समजून घेणे खूप महत्वाचे आहे. जेव्हा आपण तिसऱ्या व्यक्तीला घेऊन घरी आलात आणि त्या दिवशी तुमच्या दोघांमध्ये भांडण होत असेल. किंवा तुमच्या जोडीदाराने तुमच्यावर आरोप केले असतील तर निश्चितपणे रिलेशनशिपमध्ये असूनही, तो तुमच्यावर विश्वास ठेवत नाही. तुमच्यापेक्षा त्या तिसऱ्या व्यक्तीला जास्त महत्त्व देतो.

तुमच्या रागाला जास्त महत्त्व दिले जात नाही

जर आपण एखाद्या तिसऱ्या व्यक्तीबद्दल जोडीदाराकडे नाराजी व्यक्त केली. पण त्याचा काहीच परिणाम होत नाही. एकतर तो तुम्हाला शांत राहण्यास सांगतो किंवा तो तुम्हाला बोलण्यापासून थांबवतो. याचा अर्थ असा असू शकतो की त्याचे त्या तिसऱ्या व्यक्तीबरोबर संबंध असू शकतात. यावेळी तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे.

स्वत:बद्दल चांगलं न वाटणं

आपणास असे वाटू लागते की आपला जोडीदार आपल्यापेक्षा एखाद्या तिसऱ्या व्यक्तीला अधिक महत्त्व देत आहे आणि आपण स्वतःबद्दल वाईट विचार करण्यास सुरवात करतो. आपल्याला असे वाटते की आपण आपल्या जोडीदारासाठी योग्य व्यक्ती नाही आहोत. आपल्यात असे काही नाही जे त्यांना आपल्याकडे जोडीदाराल आकर्षित करेल.

आपलं नातं संपण्याच्या मार्गावर आहे

जर आपणास असे वाटत असेल की आपले संबंध पूर्वीसारखे दृढ नाहीत आणि ते आपल्यापेक्षा आपल्या खास मित्राला अधिक महत्त्व देत आहेत तर आपण हे ओळखले पाहिजे. यासाठी तुम्ही तयार असले पाहिजे,  की आज नाही तर उद्या तुमचे संबंध संपुष्टात येणार आहेत.


हे ही वाचा – Video : बिग बॉस मराठी ३, ‘ही’ व्यक्ती असू शकते सुत्रसंचालकाच्या भूमिकेत!


First Published on: September 1, 2020 5:24 PM
Exit mobile version