घरताज्या घडामोडीVideo : बिग बॉस मराठी ३, 'ही' व्यक्ती असू शकते सुत्रसंचालकाच्या भूमिकेत!

Video : बिग बॉस मराठी ३, ‘ही’ व्यक्ती असू शकते सुत्रसंचालकाच्या भूमिकेत!

Subscribe

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच आवडीने पाहिला जाणारा शो म्हणजे ‘बिग बॉस’. लवकरच बिग बॉस मराठीचं तिसरं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतीच तिसऱ्या पर्वाची घोषणा करण्यात आली आहे. त्याचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून बिग बॉसच्या घरात टास्क कसे रंगणार हे पाहणं प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं ठरणार आहे. त्याचबरोबर घराची थीम कशी असणार? स्पर्धक कोण असणार याबाबत प्रचंड उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे.

- Advertisement -

तिसऱ्या पर्वाचे सूत्रसंचालकसुद्धा महेश मांजरेकरच असतील का याबाबत अद्याप स्पष्टता नाही. दुसऱ्या पर्वादरम्यान रितेश देशमुख, श्रेयस तळपदे अशी काही नाही चर्चेत होती. मात्र महेश मांजरेकरांचे दोन्ही पर्वातील सूत्रसंचालन प्रेक्षकांना व स्पर्धकांना फार आवडलं. त्यामुळे या तिसऱ्या पर्वातही त्यांचीच वर्णी लागेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बिग बॉस मराठीचं पहिलं पर्व १५ एप्रिलला पार पडलं. या पर्वामध्ये अभिनेत्री मेघा धाडे विजयी ठरली. पहिल्या पर्वाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. त्यानंतर दुसरं पर्वही प्रेक्षकांच्या भेटीला आलं. या पर्वामध्ये शिव ठाकरेने ‘बिग बॉस मराठी 2’ ची ट्रॉफी जिंकली. हे दोन्ही पर्व प्रचंड गाजले. त्यामुळे आता प्रेक्षक तिसऱ्या पर्वाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

- Advertisement -

हे ही वाचा – ट्रोलिंगवर पहिल्यांदाच व्यक्त झाली आलिया, फोटो शेअर करत म्हणाली!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -