नवरा पसंत नाही तरी नाते टिकवायचेय, ‘या’ टीप्स येतील कामी

नवरा पसंत नाही तरी नाते टिकवायचेय, ‘या’ टीप्स येतील कामी

लव्ह मॅरेज असो किंवा अरेंज मॅरेज. नात्यात नेहमीच चढउतार येत असतात. तसेच रिलेशनशिपमध्ये असताना अशा काही गोष्टी घडतात त्यामुळे एकमेकांचे एकमेकांवरील प्रेम संपते. पार्टनर प्रेम करत नाही म्हणून काही कपल्स विभक्त होतात. पण काहींचे असे असते की, नाते मोडायचे असते तरीही ते तसे करु शकत नाही. यावेळी सर्वाधिक मोठा प्रश्न असा असतो की, त्या पार्टनरसोबत रहायचे कसे ज्यावर आपले प्रेम नाही.

जर तुम्हाला नवऱ्याचे बोलणे आवडत नसेल तर सर्वात प्रथम त्याला सांगा की, मी तुझ्याकडून सकारात्मक वागणूकीची अपेक्षा करत आहे. जर तुम्ही असे केलात तर तुमच्या दोघांमधील वाद कमी होती. भले तुमच्या दोघांमधील प्रेम, एकमेकांबद्दलच्या भावना नसतील तर तरीही तुम्ही तुमच्या पार्टनरच्या पॉझिटिव्ह गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे. कारण तो सुद्धा एक माणूस असून एकेकाळी तो ही तुमच्यावर प्रेम करायचा.

तुमचे नाते आधीसारखे आणि मजबूत बनवण्यासाठी एकमेकांना वेळ द्या. एकमेकांसोबत वेळ घालवा. पण जर नात्यात तुमची चूक असेल तर ती मान्य करा. कारण नवरा-बायकोवर काही जबाबदाऱ्या असतात त्या पूर्ण केल्या नाहीत तर आधीसारख्या गोष्टी राहत नाहीत.

नवऱ्याच्या सध्याच्या वागणूकीमुळे, सवयीमुळे तुम्ही नाराज होता. पण त्यांच्या दृष्टीकोनातून सुद्धा विचार करावा. कारण वैवाहिक आयुष्यात टाळी कधीच एका हाताने वाजत नाही. या व्यतिरिक्त इंटीमेसी म्हणजेच शारिरीक रुपात जवळ येणे नव्हे. तर एकमेकांसोबत भावनात्मक आणि मानसिक रुपात एकमेकांना समजून घेणे. तसेच कोणत्याही नात्यात विश्वास असणे फार गरजेचे आहे. याशिवाय तुमचे नाते घट्ट होऊच शकत नाही. पण जरी तुमचे पार्टनरशी आता पटत नसेल पण तुमचा त्यांच्यावरील विश्वास मोडू देऊ नका. हे सुद्धा लक्षात ठेवा की, तो तुमचा नवरा आहे. त्याच्या समोर एखादी गोष्ट बोलण्यासाठी घाबरु नका.


हेही वाचा- विवाहेच्छुक मुलांना पसंत पडतात ‘अशा’ मुली

 

First Published on: April 27, 2023 12:19 PM
Exit mobile version