Friday, April 26, 2024
घरमानिनीविवाहेच्छुक मुलांना पसंत पडतात 'अशा' मुली

विवाहेच्छुक मुलांना पसंत पडतात ‘अशा’ मुली

Subscribe

तुम्ही खुप वेळा पाहिले असेल की, केवळ डेट करण्यासाठी काही मुलींना पटवले जाते तर काही महिलांना खरंच आयुष्यभरासाठी एका पत्नीच्या रुपात पाहिले जाते. परंतु तुम्ही कधी असा विचार केला आहे का, मुलं समोरची मुलगी ही आपल्याशी लग्न करेल हे कसे ठरवत असतील? खरंतर मुलगी मॅरेज मटेरियल असल्याचे पुढील काही गोष्टींवरुन ओळखतात.

ब्रिटिश जनरल ऑफ सायकोलॉजी मध्ये प्रकाशित झालेल्या एका सर्वेतून असे समोर आले आहे की, मुलांना अशा मुली आवडत नाही ज्या केवळ सुंदर दिसतात. त्यांना त्या मुली आवडतात ज्या नात्याबद्दल गंभीर असतात.

- Advertisement -

आजच्या पुरुष मंडळींमध्ये पत्नीची व्याख्या ही बदलली गेली आहे. खरंतर उत्तम पत्नी असणे ही उत्तम बाब असतेच. त्यांना सुंदर दिसण्यासह ती कामात ही हुशार असायचा पाहिजे असे वाटते. मुलांना अशा मुली फार आवडतात ज्या नेहमीच पैशांसंदर्भात कधीच खोटं बोलत नाहीत. कारण येणाऱ्या काळआत पैसा हा तुमच्या नात्यात वादाचे कारण ठरु नये.

- Advertisement -

पुरुषांना अशा सुद्धा मुली आवडतात ज्या सुंदर असताच पण त्यांना कोणत्याच गोष्टीचा अधिक गर्व नसतो. खरंतर ज्या डाउन टू अर्थ असतात. अशा मुली मुलांना फार आवडतात. या व्यतिरिक्त मुलांना अशा मुली आवडतात ज्या संपूर्ण घराला उत्तम पद्धतीने सांभाळतील. तसेच एखाद्या कामासाठी त्या दुसऱ्यांवर निर्भर नसतात.

जर तुम्ही दररोज कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरुन वाद घालत असाल तर ही वाईट सवय आहे. तर समजून जा तुमच्याशी मुलं कधीच नाते बनवू इच्छित नाहीत. कारण भावनिक छळ करणाऱ्या महिलांपासून ते दूर राहतात. मुलांना अशा ही मुली आवडतात ज्या तुमच्यावर प्रेम तर करतातच पण तुमच्या भावनांचा सुद्धा आदर करतात. या व्यतिरिक्त सर्वाधिक महत्वाचे की, पुरुष पार्टनरला जेव्हा तो संकटात असतो तेव्हा त्याला पाठिंबा देणारी मुलगी आवडते. अशा मुलींशी ते आयुष्यभरासाठी साथ निभावू पाहतात.

 


हेही वाचा- महिलांना आवडतात ‘असे’ पुरुष

- Advertisment -

Manini