घरगुती उपायांनी कपाळावरचा काळपटपणा करा दूर

घरगुती उपायांनी कपाळावरचा काळपटपणा करा दूर

टॅनिंग दूर करण्यासाठी हल्ली बाजारात अनेक उत्पादने उपलब्ध असली तरी ही उत्पादने बनवण्यासाठी अनेक प्रकारच्या रसायनांनी भरलेल्या गोष्टींचा वापर यामध्ये केला जातो. ज्यामुळे तुमच्या त्वचेला हानी पोहोचते. टॅनिंग म्हणजेच सूर्यप्रकाशामुळे कपाळावरचा काळपटपणा दूर करण्यासाठी तुम्ही घरगुती उपायांचीही मदत घेऊ शकता. कपाळावरील टॅनिंग दूर करण्यासाठी कोणत्या गोष्टींचा वापर करावा आणि या गोष्टींचे त्वचेला होणारे फायदे जाणून देखील जाणून घेऊया.

कपाळ स्वच्छ करण्यासाठी काकडीचा करा उपयोग

काकडीत असलेले अँटिऑक्सिडंट त्वचेला मॉइश्चरायझिंग करण्यास मदत करतात.
यामध्ये असलेले घटक त्वचेला खोलवर स्वच्छ करण्यासाठी देखील वापरले जातात.

गुलाब पाण्याने कपाळाचा काळेपणा असा करा दूर

गुलाबाच्या पाण्यात असलेले अँटिऑक्सिडंट गुणधर्म त्वचेवरील काळे डाग दूर करण्याचे काम करतात.
हे तुमच्या त्वचेची पीएच पातळी नियंत्रित करण्यासाठी खूप उपयुक्त ठरतात.
यामध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म त्वचेच्या समस्यांपासून आराम देतात.
गुलाबाच्या पाण्यात असलेले अँटीऑक्ससिडंट गुणधर्म त्वचेच्या मृत पेशी दूर करण्यास मदत करतात .

बेसनाचा लेप कपाळावर लावल्याने होईल फायदा

बेसनामध्ये असलेले गुणधर्म त्वचेचा काळेपणा कमी करण्यास मदत करतात.
कोणत्याही प्रकारच्या त्वचेच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी बेसन खूप उपयुक्त आहे.

कपाळाचा काळेपणा दूर करण्यासाठी करा घरगुती उपाय

कपाळावरील काळेपणा दूर करण्यासाठी प्रथम काकडी कापून मिक्सरला लावून तिची पेस्ट करून घ्या.
त्यात 1 ते 2 चमचे बेसन आणि 2 चमचे गुलाबपाणी घाला.
हे सर्व चांगले मिक्स करून घ्या आणि ब्रशच्या मदतीने कपाळावर लावा.
साधारण 20 ते 25 मिनिटे चेहऱ्यावर ही पेस्ट राहू द्या.
तुम्हाला हवे असल्यास तुम्ही स्क्रबप्रमाणे हलक्या हाताने मसाज देखील करू शकता.
यानंतर कापूस आणि स्वच्छ पाण्याने चेहरा स्वच्छ करा.
काळेपणा दूर करण्यासाठी म्हणजेच टॅनिंगसाठी तुम्ही हा फेस पॅक आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरू शकता.

________________________________________________________________________

हेही वाचा : फेस्टिव्ह ग्लो साठी फॉलो करा शहनाज हुसैन च्या ‘या’ टीप्स

First Published on: September 7, 2023 6:36 PM
Exit mobile version