‘या’ घरगुती उपायांनी हटवा कपड्यांवरचे डाग

‘या’ घरगुती उपायांनी हटवा कपड्यांवरचे डाग

भारतीय घरांमध्ये हळद, लाल तिखट या मसाल्यांशिवाय भाजी पूर्ण मानली जात नाही. अनेकदा जेवण बनवताना किंवा खाताना हळदीचे किंवा लाल तिखटाचे डाग कपड्यांवर पडतात. कधी कधी हे डाग इतके चिवट असतात जे सहज धुतल्यावर देखील निघत नाहीत. अशावेळी हे डाग हटविण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांचा वापर करु शकता.

‘या’ घरगुती उपायांनी हटवा कपड्यांवरचे डाग

लिंबू


कपड्यांना लागलेला डाग तुम्ही लिंबाच्या मदतीने कमी करु शकता. त्यासाठी एक लिंबू घ्या आणि त्याला लागलेल्या डागावर पिळून अर्ध्या तासांसाठी तसचं ठेवा, अर्ध्या तासानंतर निरमा पावडरमध्ये टाकून कपडा धुवून घ्या. हा डाग साफ होईल.

टूथपेस्ट


कपड्यांना लागलेला डाग तुम्ही टूथपेस्टच्या मदतीने देखील कमी करु शकता. त्यासाठी टूथपेस्टला लागलेल्या डागावर लावा आणि काही वेळ तसचं ठेवा, डाग अजूनही तसाच दिसत असेल तर टूथपेस्टमध्ये बेकिंग सोडा मिक्स करुन कपड्यावर लावा.

ग्लिसरीन


कपड्यांवर लागलेल्या डागावर ग्लिसरीन लावा. काही वेळ कपडा तसाच ठेवा त्यानंतर निरमा पावडरमध्ये टाकून कपडा धुवून घ्या. हा डाग साफ होईल.

 


हेही वाचा :

महागडी सिल्कची साडी घरी कशी धुवायची?

First Published on: February 2, 2023 2:44 PM
Exit mobile version