Sitting job मुळे होतोय सायटीकाचा त्रास

Sitting job मुळे होतोय सायटीकाचा त्रास

वाढते वय, लठ्ठपणा आणि दीर्घकाळापर्यंत डेस्क जॉब, जड वजन उलचणे, मधुमेह अशा काही गोष्टींमुळे साइटीकची समस्या उद्भवू शकते. साइटीकाच्या स्थितीत पाय आणि कंबरेखालील भाग हा वारंवार सुन्न होतो. तसेच पाय आणि कंबरेखालचा भागात खुप वेदना होतता. स्नायू खेचल्यासारखे होतात. ही समस्या सर्वसामान्यपणे वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर सुरु होते. तसेच कमी वयातील लोकांना ही समस्या होऊ शकते.सायटीकाच्या दुखण्यापासून सुटका मिळवणे मुश्किल नाही. यावर तुम्ही काही घरगुती उपाय ही करु शकता.

-हॉट आणि कोल्ड कंप्रेसची मदत घ्या


जर तुम्ही सायटीकाच्या स्थितीने ग्रस्त असाल आणि त्याचे दुखणे वाढले असेल तर सुरुवातीच्या ७२ तासांमध्ये कोल्ड कंप्रेसची मदत घेऊ शकतो. खासकरुन जर तु्म्हाला दुखापत झाल्याने तसे होत असेल तर आइस पॅक लावून सूज कमी करु शकता. जेणेकरुन दुखण्यापासून आराम मिळेल. कधीच आइस पॅक त्वचेवर थेट लावू नका. तो एखाद्या टॉवेलवर घ्या आणि नंतरच वापरा. तर ७२ तासानंतर तुम्ही हीट अप्लाय करु शकता.

-शरिराची हालचाल फार महत्वाची


साइटिकाच्या स्थितीत एकाच ठिकाणी दीर्घकाळ बसून राहू नका. यामुळे उठताना तु्म्हाला त्रास होऊ शकतो. साइटीकाची समस्या उद्भवल्यास तुम्हाला चालण्यास-फिरण्यास थोडा त्रास होऊ शकतो. परंतु, थोडावेळ तरी शरिराची हालचाल करण्याचा प्रयत्न करा.

-बॉडी पॉस्चर बदलत रहा


साइटीकाच्या दुखण्यापासून त्रस्त असाल तर दीर्घकाळापर्यंत एकाच बॉडी पॉस्चरमध्ये बसून राहू नका. अशाच तुम्ही तुमच्या डेस्कवर बसून काम करत असाल, गेम खेळत असाल तर नेहमी २० मिनटांनी आपल्या शरिराचे पॉस्चर बदल रहा. जर तुम्ही योग्य बॉडी पॉस्चरमध्ये बसून रहाल तर यामुळे साइटीकाच्या समस्येला कंट्रोल करण्यास मदत होईल.

-अरोमाथेरपीमुळे ही मिळेल आराम


काही प्रभावी एसेंसिशल ऑइलचा वापर करत प्रभावित ठिकाणी मसाज केल्याने दुखण्यापासून आराम मिळू शकतो. त्याचसोबत अंघोळीच्या पाण्यात ही तुम्ही ते टाकू शकता. जेणेकरुन शरिराला आराम मिळेल. लेवेंडर, रोजमेरी, पेपरमिंट आणि जिंजर एसेंशियल ऑइलचा वापर हा दुखण्यापासून आराम मिळण्यासह इन्फ्लेमेशनला कमी करण्यास मदत करतो.


हेही वाचा-प्रत्येक महिलेला माहीत असाव्यात ‘या’ 5 गुप्त गोष्टी

First Published on: April 29, 2023 12:23 PM
Exit mobile version