चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी दूधात मिक्स करा ‘या’ गोष्टी

चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी दूधात मिक्स करा ‘या’ गोष्टी

प्रत्येकालाच वाटते की आपली स्किन ग्लो आणि अॅक्ने फ्री दिसावी. मात्र आजकालच्या धावपळीच्या लाइफस्टाइलमध्ये स्ट्रेस आणि प्रदुषणामुळे त्वचा काळवंडली जाते. अशातच आपण आपल्या आरोग्यासह स्किनची सुद्धा काळजी घेत नाही. त्यामुळे जर तुम्हाला चेहऱ्यावर ग्लो आणायचा असेल तर दूधात पुढील काही गोष्टी मिक्स करुन त्याचा फेसपॅक बनवून चेहऱ्याला लावल्यास नक्कीच तुम्हाला त्याचे रिजल्ट्स मिळतील.

-मध, केळ आणि कच्चे दूध


केळ्यात भरपूर प्रमाणाता पोटॅशिअम, व्हिटॅमिन सी आणि ई असते. तर मध तुम्हाला स्किन ग्लो करण्यासाठी मदत करते. दूधामुळे डेड स्किन हटवण्यास मदत होते. केळ्याचा फेसपॅक हा स्किन केअर रुटीनमध्ये तुम्ही जरुर वापरू शकता.

याचा फेस पॅक बनवण्यासाठी एक केळ, कच्चे दूध आणि मध मिक्स करा. या पेस्टमध्ये गुलाब पाण्याचे काही थेंब टाका आणि ती चेहरा आणि मानेला लावा. हा पॅक 15 मिनिटांसाठी लावून ठेवा आणि नंतर पाण्याने स्वच्छ धुवा.

-छासचा फेसपॅक


छासमध्ये एक्सफोलिएटिंग गुण असतात. याचा दररोज वापर केल्याने स्किन ग्लो आणि चमकते. याचा पॅक तयार करण्यासाठी एका मोठ्या वाटीत 1/2 कप छास घ्या. त्यात दही मिक्स करा आणि तो पॅक चेहऱ्याला लावून ठेवा. किमान एक तास तरी तो पॅक चेहऱ्याला असू द्या आणि नंतर पाण्याने चेहरा धुवा.

-बेसन, हळदीचा फेस पॅक


बेसनात प्रोटीन, फाइबर आणि कार्ब्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे काळे डाग, पिंपल्स आणि अँन्टी एजिंगसह स्किन संबंधित काही समस्या दूर होतात. या व्यतिरिक्त हळदीमुळे त्वचा उजळ होते.

हा पॅक तयार करण्यासाठी तुम्ही एका वाटीत दोन मोठे चमचे बेसन, चिमुटभर हळद आणि दही घेऊन त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट तुमच्या स्किनवर लावा आणि 15-20 मिनिटे राहू द्या. त्यानंतर जेव्हा पेस्ट सुकेल तेव्हा चेहरा धुवा. जर तुमची स्किन तेलकट असेल तर त्यात लिंबाच्या रसाचे काही थेंब टाकू शकता.


हेही वाचा- Skin Care : तेलकट त्वचेसाठी हिरवे मूग फायदेशीर

First Published on: September 10, 2023 1:17 PM
Exit mobile version