Saturday, May 11, 2024
घरमानिनीBeautySkin Care : तेलकट त्वचेसाठी हिरवे मूग फायदेशीर

Skin Care : तेलकट त्वचेसाठी हिरवे मूग फायदेशीर

Subscribe

जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही त्याची काळजी घेण्यासाठी हिरव्या डाळीच्या उपयोग करू शकता. जेव्हा आपण त्वचेची काळजी घेतो तेव्हा प्रत्येकाला सर्वोत्तम स्किन हवी असते. तसेच बहुतेक लोक बाहेरच्या अनेक कॉस्मॅटिक प्रॉडक्ट्सचा वापर करताना पाहायला मिळतात. परंतु त्वचेची काळजी घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे नैसर्गिक गोष्टींचा वापर करणे. यापैकी एक म्हणजे हिरवी मूग डाळ.

हिरवी मूग डाळ त्वचेला एक्सफोलिएंट म्हणून काम करते. ज्यामुळे तुमची त्वचा खोलवर स्वच्छ होते. इतकेच नाही तर यामध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्व असतात, जे तुमच्या त्वचेची काळजी घेतात.

- Advertisement -

हिरवी मूग डाळ तुमच्या त्वचेची छिद्रे साफ करतात. तसेच, त्याचे नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म त्वचा चमकदार बनवतात. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही हिरवी मूग डाळ वापरू शकता. चला तर मग जाणून घेऊया त्वचेसाठी हिरवी मूग डाळ कशी फायदेशीर आहे.

मूग डाळ आणि टोमॅटोचा रस वापरा

जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही टोमॅटोचा रस मूग डाळीत मिसळून लावू शकता.

- Advertisement -

साहित्य

  • हिरवी मूग डाळ – २ चमचे
  • पाणी – आवश्यकतेनुसार
  • टोमॅटो रस – 1 टीस्पून
  • दही – 1 टीस्पून

HOW TO MAKE A MUNG BEAN SCRUB — AND WHY YOU SHOULD — Jasmine Hemsley

पद्धत

  • मूग डाळीचा फेस पॅक बनवण्यासाठी प्रथम हिरवी मूग डाळ सुमारे 2-3 तास पाण्यात भिजत ठेवा.
  • आता जास्तीचे पाणी काढून टाका आणि त्याची पेस्ट बनवा.
  • आता त्यात टोमॅटोचा रस आणि दही घालून मिक्स करा.
  • दह्यामध्ये लॅक्टिक ऍसिड असते. जे त्वचेला एक्सफोलिएट करण्यासोबतच चेहरा चमकावतात.
  • दही मुगाच्या पेस्ट मध्ये चांगली मिसळल्यानंतर संपूर्ण लावून घ्या.
  • तयार केलेली पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटे राहू द्या.
  • शेवटी, चेहरा पाण्याने स्वच्छ करा. हे केल्यावर तुमचा चेहरा मॉइश्चरायझ झालेला दिसून येईल.

_______________________________________________________________________

हेही वाचा :

- Advertisment -

Manini