मसालेदार चमचमीत खाण्याचे साईड इफेक्ट्स

मसालेदार चमचमीत खाण्याचे साईड इफेक्ट्स

चटपटीत पदार्थ खाणे प्रत्येकालाच आवडते. मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का, तिखट-झणझणीत पदार्थ आरोग्य बिघडवू शकतेच आणि त्याचसोबत आजार ही पाठी लागू शकतात. अशातच मसालेदार चमचमीत खाण्याचे काय साईड इफेक्ट्स होतात याच बद्दल जाणून घेऊयात.

पोट बिघडले जाते
कधी-कधी मसालेदार पदार्थ खाणे ठिक आहे. मात्र दररोज मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पोट बिघडणे आणि लूज मोशन होऊ शकते. मसाल्यांमध्ये कॅप्साइसिन असते जे अधिक खाल्ल्याने पोटाच्या आतील स्तराला नुकसान पोहचवते.

यामुळे मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पोटात जळजळ होते. कॅप्साइसिन खाल्ल्याने मळमळ, उलटी, पोट दुखी आणि जळजळ सारख्या समस्या उद्भवू शकते.

गॅसची समस्या
अधिक तेलकट पदार्थ खाल्ल्याने शरीरातील पीएच बॅलेन्स बिघडला जातो. शरीराचा एक पीएच स्तर असतो. अधिक तेलकट मसालेदार पदार्थांमध्ये मिर्ची, हर्ब्सचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे पित्त वाढले जाऊ शकते. याच कारणास्तव मसालेदार पदार्थ खाल्ल्याने शरीरात अॅसिडिटी वाढली जाते आणि छातीत जळजळची समस्या निर्माण होऊ शकते.

अल्सरची समस्या
कॅप्साइन पोटातील अॅसिडचे प्रोडक्शन वाढवते. त्यामुळे गॅस्ट्रिक अल्सर आणि पेप्टिक अल्सरची समस्या असू शकते. यामुळे पोटात जखम ही होऊ शकते. अधिक मसालेदार पदार्थ खाल्ल्याने आतड्यांचा आजार जसे कोलाइटिसचे कारण ठरू शकतो.

लिवरची समस्या
स्पाइसी डाएट लिवरसाठी फार नुकसानकारक ठरू शकते. अधिक मसालेदार पदार्थातील तेल हे लिवरला चिकटले जाते आणि लिव्हरमध्ये फॅट जमा होऊ लागते. जे फॅटी लिवरटे कारण ठरू शकते.


हेही वाचा- लाल तिखटाचा अतिवापर ठरू शकतो घातक

First Published on: October 10, 2023 11:03 AM
Exit mobile version