Wednesday, December 6, 2023
घरमानिनीHealthतणावाचा पीरियड्सवर होतो परिणाम, असे रहा दूर

तणावाचा पीरियड्सवर होतो परिणाम, असे रहा दूर

Subscribe

पीरियड्सच्या दिवसात महिलांना काही समस्यांचा सामना करावा लागतो. अशातच तुम्ही तणावाखाली असाल तर ही समस्या अधिक वाढली जाऊ शकते. खरंतर लहान लहान गोष्टीवरुन घेतले जाणारे टेंन्शन आपल्या आयुष्यात काही प्रकाराने प्रभावित करते. महिलांमध्ये शरीरात होणारे हार्मोनल बदल आणि अनहेल्दी लाइफस्टाइलसुद्धा तणावाचे कारण ठरू शकते. यापासून दूर राहण्यासाठी नक्की काय करावे हे पाहूयात.

-हाइड्रेट रहा

- Advertisement -

Hydrate | tyello.com
तणावापासून दूर राहण्यासाठी हाइड्रेट राहणे अत्यंत गरजेचे असते. यामुळे मेंदूत ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होतो. जो तुम्हाला चिंता आणि नैराश्यापासून दूर राहू शकता. या व्यतिरिक्त वॉटर इनकेट वाढवल्यास पीरियड्समध्ये ब्लड फ्लो सुद्धा व्यवस्थितीत राहतो.

-हेल्दी डाएट खा

- Advertisement -

The 10 Best Diets for Better Heart Health, Ranked by Cardiologists
जेव्हा तुम्ही डीप फ्राइड आणि तिखट पदार्थ खाता तेव्हा त्याचा शरीरावर नकारात्मक प्रभाव पडतो. यामुळे पोषक तत्वे पूर्णपणे मिळत नाही. त्यामुळे पीरियड साइकल नियमित ठेवण्यासाठी हेल्दी डाएट जरुर घ्या.

-एक्सरसाइज जरूर करा


दिवसातून एकदा तरी एक्सरसाइज केल्याने तुम्ही हेल्दी राहू शकता. यामुळे ब्रेन हेल्दी राहते. त्यामुळे तुमचे शरीर योग्य प्रकारे फंक्शन करू लागते. योगा केल्याने पीरियड्स क्रॅम्प्स आणि तणाव दोन्ही कमी केला जाऊ शकतो.

-वेळच्या वेळी झोपा


तणावापासून दूर राहण्यासाठी वेळच्या वेळी झोपणे गरजेचे असते. झोप पूर्ण न झाल्यास तुम्हाला थकवा येऊ शकतो आणि ब्रेन हॅप्पी हार्मोन रिलीज करत नाही. यापासून दूर राहण्यासाठी तुम्ही वेळच्या वेळी झोपा आणि सकाळी लवकर उठून व्यायाम करा.


हेही वाचा- पीरियड्स क्रॅम्प्स, बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी प्या आल्याचे पाणी

- Advertisment -

Manini