स्टाइल ‘डेनिम’ची

स्टाइल ‘डेनिम’ची

RIPPED JEANS

उन्हाळा, हिवाळा , पावसाळा.. कोणताही ऋतु असो; डेनिम हे ऑल सीजन आउटफिट आहे. त्यामुळे ही डेनिम आता कशाप्रकारे स्टाइल करायची आणि त्याचे किती प्रकार आहेत हे जाणून घ्या.

फ्लेअर जीन्स –

ही डेनिम जीन्स खालून मोठी असते. याला लाँग बॉटम असतात. या लाँग बॉटम्सला फ्लेअर बॉटम जीन्स किंवा बेल बॉटम जीन्स असेही म्हणतात. ही जीन्स सध्या खूप ट्रेंडिंग आहे. याचे कूल आणि फंकी लूक खरंच ट्रेंडिंग आहे. ही जीन्स कंफरटेबल असते.

रिप्प जीन्स –

खूप वर्षांपासून रिप्प जीन्स खूप पॉप्युलर आहे. गुडघ्यावर, मांड्यांवर, खाली पायावर फाटलेली म्हणजे रिप्प असलेली जीन्स सध्या मुलं आणि मुलींमध्ये पॉप्युलर आहे. कॉलेज युवकांनी या डेनिमला पसंती दिली आहे. थोडीशी फाटलेली पासून पायाचा संपूर्ण भाग रिप्प असणे, असे यात देखील विविध प्रकार आले आहेत.

बॉयफ्रेन्ड जीन्स –

सर्वात सैल आणि कन्फरटेबल जीन्स कोणती असेल तर ती आहे बॉयफ्रेन्ड जीन्स. या जीन्सचे कापड खूप सॉफ्ट असते. दिवसभर बाहेर असताना आपण जीन्स घालतो. दररोज त्या टाइट आणि अंगाला चिकटणार्‍या जीन्स घालून आपल्याला त्रास होतो. त्वचेवर रॅशेस आणि इरिटेशन होऊ शकते. त्यामुळे एकदम कन्फरटेबल आणि हलके वाटणारे, शिवाय एक नवा फ्रेश लूक देते तुम्हाला.

हाय वेस्ट जीन्स –

हाय वेस्ट जीन्स अर्थात नावाप्रमाणेच ही जीन्स कंबरेच्या वरपर्यंत असते. ही जीन्स जवळपास तुमची नाभी आणि अर्धे पोट झाकते. क्रॉप टॉप वर हाय वेस्ट जीन्स चालतात. एक ओवरऑल मॉर्डन येतो तुमच्या आउटफिटला. हाय वेस्ट स्कर्ट आणि हाय वेस्ट शॉर्ट ही आजकल मार्केटमध्ये आले आहेत. तरुणाईने याला खूप पसंती दिली आहे. या डेनिममुळे बॉडी शेप आणि फिगर उठून दिसते.

First Published on: November 25, 2018 5:27 AM
Exit mobile version