पद्मभूषणने सन्मानित सुधा मुर्तींच्या आयुष्यातील खास किस्से

पद्मभूषणने सन्मानित सुधा मुर्तींच्या आयुष्यातील खास किस्से

आयुष्यात खुप मोठं व्हायच असतं पण संघर्ष सतत येतात म्हणून खचून जाणे हा जगण्याचा मंत्रा नाही. त्या संघर्षांवर मात करत आणि त्यामधून शिकत पुढे जाणे म्हणजेच खऱ्या अर्थाने आयुष्य जगणे. त्यापैकीच एक असलेल्या सुधा मुर्ति यांनी सुद्धा आपल्या नवऱ्या सोबत मिळून एक मोठी सॉफ्टवेअर कंपनी उभारली. मुलांच्या पालनपोषणासाठी काही काळासाठी करियरला ही फूल स्टॉप दिला होता. परंतु नंतर आपले स्वप्न सत्यात उतरण्यासाठी त्यांनी नेहमीच प्रयत्न केला. आयुष्यात अनेक संघर्ष केली पण त्यामुळे त्या कधीच खचल्या नाहीत. अशा सुधा मुर्ती यांच्याबद्दलचे काही किस्से आपण जाणून घेणार आहोत.

सुधा मुर्तींची साधेपणा आणि आत्मविश्वास हा प्रत्येक महिलेला आयुष्यात पुढे जाण्याची प्रेरणा देतो. एक इंजिनिअर, लेखक आणि सोशल वर्करच्या रुपात प्रसिद्ध असलेल्या सुधा मुर्तींना पद्म भूषण पुरस्काराने ही गौरवण्यात आले आहे.

सुधा मुर्ती यांचा जन्म १९ ऑगस्ट १९५० मध्ये उत्तर कर्नाटकातील शिगांव येथे झाला होता. श्री नारायण मुर्ती यांच्यासोबत विवाह होण्याआधी त्यांचे नाव सुधा कुलकर्णी असे होते. त्यांनी बी.वी.बी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड टेक्नॉलॉजी मधून इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग केले होते. बालपणापासूनच अतिशय हुशार असलेल्या सुधा मुर्तिंनी इंजिनिअरिंगमध्ये पहिला नंबर काढला आणि कर्नाटकाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते रजत पदक ही स्विकार केले.

सन १९७४ मध्ये त्यांनी इंडियन इंस्टिट्युट ऑफ सायन्स मधून कंप्युटर सायन्समध्ये मास्टर डिग्री मिळवली. खरंतर एक महिला असून ऐवढे यश मिळवणे सोप्पे नव्हते.

१९६० च्या दशकात जेव्हा प्रत्येक क्षेत्रात पुरुषांचा दबदा होता त्याच काळात इंजिनिअरिंग करणे महिलांसाठी केवळ एक स्वप्नच होते. परंतु सुधा मुर्तींनी आपल्या स्वप्नाला सत्यात उतरवण्याचा विचार केला. त्यावेळी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये १५० विद्यार्थ्यांमध्ये त्या एकट्याच महिला होत्या ज्यांनी त्यासाठी प्रवेश घेतला होता.

तेथे सुद्धा त्यांना काही समस्यांचा सामना करावा लागला आणि त्यांचा विरोध ही केला गेला. पण सुधा मुर्तींची कधीच मागे वळून पाहिले नाही. ऐवढेच नव्हे तर इंजिनिअरिंग कॉलेजच्या मुख्याध्यापकांनी त्यांच्या समोर अशी अट ठेवली होती की, त्या केवळ साडीच नेसतील आणि कोणत्याही मुलाशी बोलू नये. सुधा मुर्तींसाठी या अटी केवळ सामान्य होत्या. पण आपले अस्तित्व निर्माण करण्याकडे त्यांनी प्राधान्य दिले.

इंजिनिअरिंगची परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर सुधा मु्र्ती भारतातील सर्वाधिक मोठी ऑटो निर्माता कंपनी टाटा इंजिनिअरिंग आणि लोतोमोटिव कंपनी मध्ये काम करणाऱ्या पहिल्याच महिला इंजिनिअर होत्या. नोकरी करतानाच त्यांची भेट नारायण मुर्ती यांच्याशी झाली. या दोघांनी लग्न केले. नारायण मुर्तींना व्यवसाय करायचा होता. पण आर्थिक तंगी सुद्धा सतावत होती.

त्यावेळी सुधा मुर्तींनी आपले कर्तव्य पार पाडत आपल्याकडे जमा झालेली १० हजारांची रक्कम नारायण मुर्तींना त्यांची कंपनी सुरु करण्यासाठी दिले. याच पैशांच्या आधारवर नारायण मुर्तींनी इंफोसिस कंपनीची सुरुवात केली होती. पण आज ही जगातील सर्वाधिक मोठी सॉफ्टवेअर कंपनीपैकी एक आहे.

सुधा मुर्ती या एक इंजिनिअर असण्यासोबत उत्तम लेखिका सुद्धा आहेत. त्यांची १.५ मिलियनपेक्षा अधिक पुस्तके विकली गेली आहेत. यामध्ये लहान मुलांसाठी ते शॉर्ट स्टोरीज, टेक्निकल बुक्सचा ही समावेश आहे.


हेही वाचा- Vogue मध्ये झळकली ट्रायबल वुमेन सीता वसुनिया

First Published on: April 28, 2023 1:14 PM
Exit mobile version