उन्हाळ्यात नितळ त्वचेसाठी टॉमॅटोचे ‘हे’ फेसपॅक नक्की ट्राय करा

उन्हाळ्यात नितळ त्वचेसाठी टॉमॅटोचे ‘हे’ फेसपॅक नक्की ट्राय करा

उन्हाळ्यात फार उष्णतेमुळे बहुतांश जणांची त्वचा काळवंडते. तसेच चेहऱ्याचा ग्लो सुद्धा कमी झालेला दिसतो. चेहऱ्याची त्वचा अधिक तेलकट ही होते. परंतु काही ब्युटी हॅक्सच्या माध्यमातून तुम्ही उन्हाळ्यात तुमची त्वचा तजेलदार आणि नितळ ठेवू शकता. यासाठी केवळ टोमॅटोचा वापर करुन ही चेहऱ्याचा ग्लो कायम ठेवू शकता.

टोमॅटो आणि लेमन फेसपॅक
टोमॅटोमध्ये टॅनिंग काढण्याचे गुण असतात. तसेच व्हिटॅमिन सी मुळे हायपरपिंग्मेंटनश ही कमी होते. यासाठी तुम्ही एक चमचा टॉमेटोचा पल्प घेऊन त्यात एक चमचा लिंबाचा रस टाका. हे मिश्रण एकत्रित केल्यानंतर ते त्वचेवर 10 मिनिटे तसेच राहू द्या.

टोमॅटो आणि मधाचा फेसपॅक
यामुळे तुमची त्वचा कोमल आणि मऊ होते. यासाठी तुम्ही दोन टेबलस्पू टोमॅटोचा पल्प घ्या आणि त्यात एक टेबलस्पून मध मिक्स करा. हा पॅक त्वचेवर 10 मिनिटांसाठी ठेवा आणि नंतर थंड पाण्याने स्वच्छ धुवा.

टोमॅटो आणि काकडी फेसपॅक
काकडीत अँन्टीऑक्सिडेंट गुण असतात. हे गुण स्किनसाठी खासकरुन उन्हाळ्यात फायदेशीर ठरतात. यासाठी अर्धा स्मॅश केलेला टोमॅटो आणि अर्धी किसलेली काकडी घ्या. या दोन्ही गोष्टी एकत्रित व्यवस्थितीत मिक्स करा आणि तुमच्या चेहऱ्याला 10 मिनिटे लावून ठेवा.

टोमॅटो, नारळाचे तेल आणि दही फेसपॅक
नारळाचे तेल हे नैसर्गिक उपचारासाठी वापरले जाते. तर दह्यात लॅक्टिक अॅसिड असल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्याच नव्हे तर डेड स्किन ही हटवण्यास मदत करते. यासाठी अर्धा स्मॅश केलेला टोमॅटो घ्या, त्यात एक चमचा नारळाचे तेल आणि एक चमचा दही घ्या. हे सर्व मिश्रण एकत्रित करुन त्याची एक पेस्ट तयार करा. हा फेसपॅक तुमच्या चेहऱ्याला 10 मिनिटे लावून ठेवल्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.

टोमॅटो बेसन फेसपॅक
टोमॅटो आणि बेसनचा फेसपॅक तुमची त्वचा उन्हाळ्यात नितळ ठेवण्यास मदत करेल. तसेच काळे डाग ही यामुळे दूर होती. हा फेसपॅक बनण्यासाठी तुम्ही दोन टेबलस्पून बेसन आणि एक स्मॅश केलेला टोमॅटो घ्या. या दोन्ही गोष्टी एकत्रित करत त्यांचा फेसपॅक बनवा आणि तो चेहऱ्याला लावा. हा पॅक 10 मिनिटे लावून ठेवल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा.

टोमॅटो आणि पपई फेसपॅक
पपईत व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते. यामुळे वयाआधीच म्हातारे दिसण्याची समस्या, पिंपल्सची समस्या दूर राहते. हा फेसपॅक तयार करण्यासाठी पपईचा आणि टोमॅटोचा पल्प एकत्रित करा. असे केल्यानंतर हा फेसपॅक चेहऱ्याला 10 मिनिटं लावून ठेवा.


हेही वाचा- Skin care : Peanut Face Pack मुळे येईल चेहऱ्याला ग्लो

First Published on: May 26, 2023 12:25 PM
Exit mobile version