Tuesday, May 14, 2024
घरमानिनीमुलांची वेगाने उंची वाढवण्यासाठी 'हे' फुड्स ठरतील फायदेशीर

मुलांची वेगाने उंची वाढवण्यासाठी ‘हे’ फुड्स ठरतील फायदेशीर

Subscribe

मुलांना लहानपणापासूनच योग्य डाएट न मिळाल्यास त्यांच्या उंचीवर त्याचा परिणाम होतो. खरंतर मुलांची उंची वाढणे हे जीनवर अवलंबून असते. उत्तम भोजनामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि मुलं सुद्धा आजारपणापासून दूर राहतात. परंतु तुमचे मुलं वारंवार आजारी पडत असेल तर त्याचा परिणाम त्यांच्या उंचीवर जरुर पडतो. अशातच मुलाच्या एकूणच विकासासाठी पोषक तत्वयुक्त आहार फार महत्वाचा असतो. तुम्ही मुलांच्या आहारात अशा काही गोष्टींचा समावेश केला पाहिजे ज्यामुळे त्यांची उंची वेगाने वाढेल. तर पाहूयात असे कोणते फूड्स आहेत जे तुम्ही मुलांना उंची वाढवण्यासाठी दिले पाहिजेत

-दूध
मुलांसाठी सर्वाधिक महत्वाचा आहार म्हणजे दूध. दूधात प्रोटीन, कॅल्शिअम आणि अन्य पोषक तत्व असतात. जी मुलांच्या एकूणच विकासासाठी मदत करतात. दूध प्यायल्याने मुलांचे आरोग्य आणि उंची या दोघांवर ही सकारात्मक परिणाम होतो. मुलांची उंची जर वेगाने वाढवायची असेल तर कमीत कमी २ वेळेस त्यांना दूध पिण्यास जरुर द्या.

- Advertisement -

-सोयाबीन
मुलांची उंची वाढण्यासाठी नेहमीच प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश खाण्यापिण्यात करावा असे सांगितले जाते. त्यामुळे सोयाबिन हा प्रोटीनचा उत्तम स्रोत असल्याने मुलांना तुम्ही ते देऊ शकता. सोयाबिनमुळे हाडं मजबूत होतात. त्याचसोबत यामध्ये अॅमिनो अॅसिड आणि अन्य दुसरी पोषक तत्वे ही आढळून येतात.

child height increased
child height increased

-अंडी
मुलांना दररोज एकतरी अंड खाण्यासाठी द्या. अंड खायला दिल्यास मुलांना प्रोटीन, राइबोफ्लेविन, बायोटिन आणि लोह मिळते. ज्यामुळे मुलाचा शारिरीक आणि मानसिक विकास हा उत्तम प्रकारे होतो.

- Advertisement -

-हिरव्या भाज्या
मुलांच्या खाण्यात हिरव्या पालेभाज्यांचा खासकरुन समावेश करा. तु्म्ही त्यांना पालक, कोबी, केळं आणि ब्रोकलीचा समावेश करु शकता. या भाज्यांमध्ये माइक्रो न्युट्रिएंट्स असतात. ज्यामुळे मुलांचा शारिरीक विकास उत्तम होतो. या भाज्यांमध्ये कॅल्शियम असते ज्यामुळे हाडं मजबूत होण्यास मदत होते.

-ड्रायफ्रुट्स आणि नट्स
मुलांच्या खाण्यापिण्यात सुक्या मेव्याचा समावेश करु शकता. अशातच तुम्ही बदाम, अक्रोड, पिस्ता, काजू, खजूर आणि अंजीर सारखे ड्रायफ्रुट्स तुम्ही त्यांना खाण्यास देऊ शकता. नट्सला पोषक तत्वांचे पॉवरहाउस असल्याचे म्हटले जाते. यामध्ये विटामिन, मिनिरल्स, हेल्टी फॅट, प्रोटीन आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिडचा समावेश असतो. यामुळे हाडांच आरोग्य उत्तम राहते.

 

 


हेही वाचा: पालकांनो १२ वर्षाच्या मुलांना शिकवायलाच हवीत ही कामे

 

- Advertisment -

Manini