Friday, May 10, 2024
घरमानिनीपालकांनो १२ वर्षाच्या मुलांना शिकवायलाच हवीत ही कामे

पालकांनो १२ वर्षाच्या मुलांना शिकवायलाच हवीत ही कामे

Subscribe

प्रत्येक पालकांचे मुलांवर प्रेम असते. यामुळे बऱ्याचवेळा याच प्रेमातून पालकं मुलांचे सगळे लाड पुरवत असतात. त्यांना काय हवं नको याची काळजी तर घेतच असतात शिवाय मुलांची कामेही पालकच करतात. यामुळे मुलं आळशी तर होतातच शिवाय अतिलाडामुळे हट्टी होतात. पालकांचे हे अतिलाड पुढे त्यांनाच नाही तर त्या मुलांनाही त्रासदायक ठरू शकतात. यामुळे मुलांनी वयाची बारा वर्ष पूर्ण केली की पालकांनी त्यांना स्वावलंबनाचे, जबाबदारीचे धडे देणे गरजेचे असते.

- Advertisement -

घरातील सामान आणण्यास सांगणे

मुलांना लहान वयातच स्मार्ट बनवणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांना स्वता:चे काम स्वता: करायला सांगायला हवे. वयाची बारा वर्ष पूर्ण झालेले मूल बऱ्यापैकी जाणकार असते. हल्लीची मुलं मोबाईल आणि आजूबाजूच्या वातावरणामुळे लवकर हुशार झालेली आपण पाहतो. नको तेवढी माहिती त्यांच्याकडे आता सहज उपलब्ध असते. यामुळे मुलांचे अतिलाड करून त्यांना बिघडवण्यापेक्षा त्यांना दुकानातून लहान मोठ्या वस्तू , सामान आणण्यास सांगावे. त्यामुळे त्यांना पैशांचे व्यवहार समजतात. बाहेरच्या लोकांबरोबर कसे बोलावे वागावे तेही कळते. त्यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होतो.

- Advertisement -

मुलांना किचनचे ज्ञान द्यावे
बारा वर्षांच्या मुलांना किचनची ओळख करून द्यावी. हल्लीच्या मुलांना मॅगी, नूडल्स, अंडी बॉईल करायचे शिकवा, दूध गरम करणे, ब्रेडला बटर, जाम लावायला सांगा. जमल्यास चहाही बनवायला सांगा. ज्यामुळे जर एखाद्या प्रसंगी तुम्ही घरी नसाल किंवा तो उद्या कुठे बाहेर गेला तर तो स्वत: स्वता:साठी आणि इतरांसाठी काहीतरी पदार्थ बनवू शकतो. भूक लागल्यावर त्याला इतरांवर अवलंबून राहण्याची गरज राहणार नाही.

 

वस्तू जागेवर ठेवणे
जर तुम्हाला आपल्या मुलांना स्वावलंबी आणि आत्मविश्वासी बनवायचे असेल तर सगळ्यात आधी त्याची सुरुवात त्यांच्याच बेडरुमपासून करा. त्यासाठी त्यांना त्यांच्याच वस्तू आवरायला लावा. वस्तू जागच्या जागी कशा ठेवायच्या ते रुमालापसून कपड्यांच्या घड्या कशा घालायच्या यापासून बेडवरची चादर व्यवस्थित कशी अंथरायची हे आधी शिकवा. सुरुवातीला त्यांना गंमत वाटेल नंतर त्यातूनच त्यांना नीटनेटके राहण्याचीही सवय लागेल. अशा पद्धतीने मुलं हळूहळू घर कसं टापटीप ठेवायचं ते पण शिकतील.

ऑनलाईन बुकींग

सध्याचे युग हे डीजिटल युग आहे. यामुळे मुलांनी डिजिटली अपडेट राहणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांना ऑनलाईन सामान ऑर्डर करणे, कॅब बुक करणे , बिलं भरणे शिकवा. त्यातूनच ते डिजिटली हुशार होतील.

 

 

 

 

 

 

 

 

- Advertisment -

Manini