घरक्रीडा5 षट्कार ठोकणारा रिंकू सिंग कधीकाळी घरोघरी पोहचवायचा सिलिंडर, झाडू पोछाही करायचा

5 षट्कार ठोकणारा रिंकू सिंग कधीकाळी घरोघरी पोहचवायचा सिलिंडर, झाडू पोछाही करायचा

Subscribe

नवी दिल्ली : रविवारी (9 एप्रिल) पार पडलेल्या गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स सामन्यात शेवटच्या 6 चेंडू 29 धावांची गरज असताना रिंकू सिंगने सलग 5 चेंडूत 5 षटकार मारत कोलकाता नाईट रायडर्सला विजय मिळवून दिला. अशक्य वाटणारी बैठक त्याने शक्य केल्यामुळे प्रत्येकाच्या ओठावर त्याचे नाव आहे.

रिंकू सिंगने यावेळी केवळ सामना जिंकवून दिला नाही तर अनेक विक्रम मोडले आहेत. रिंकूपूर्वी एकाही खेळाडूने टी-20 लीग किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या 20 व्या षटकात सलग 5 षटकार मारून आपल्या संघाला विजय मिळवून दिला नाही आहे. शेवटच्या षटकात सर्वाधिक 29 धावा मारत संघाला विजय मिळवून देण्याचा विक्रम रिंकू सिंगच्या नावावर आहे. याआधी महेंद्रसिंग धोनीने शेवटच्या षटकात 23 धावा मारत चेन्नई संघाला विजय मिळवून दिला होता.

- Advertisement -

5 षटकार मारल्यानंतर रिंकू काय म्हणाला
सामन्यानंतर रिंकू म्हणाला की, “मी एका शेतकरी कुटुंबातून आलो आहे आणि माझ्या वडिलांनी खूप संघर्ष केला आहे. मी मैदानाबाहेर मारलेले सर्व शॉट्स माझ्यासाठी आतापर्यंत ज्यांनी बलिदान दिले आहे त्यांना समर्पित आहेत.”

कोलकाता संघाने रिंकू सिंगला 80 लाख रुपयांना विकत घेतले होती. यातील फक्त 20 लाख त्याला मिळतील अशी अपेक्षा होती. तेही त्यांच्यासाठी पुरेसे होते, कारण तो एका गरीब कुटुंबातून येतो. मात्र रिंकू सिंग सलग 5 षटकार मारून आयपीएलमधील सर्वात लोकप्रिय खेळाडू बनला असला तरी एक काळ असा होता जेव्हा रिंकू सिलिंडर पोहोचवण्याची तसेच झाडू मारण्याची आणि लादी पुसण्याची कामे करत होता.

- Advertisement -

कोलकाता संघाला दिलेल्या मुलाखतीत रिंकूने त्याच्या आयुष्याविषयी सांगितले आहे. तो म्हणाला की, “माझ्या कुटुंबात ५ भाऊ आहेत. वडील सिलिंडर डिलिव्हरीचे काम करायचे आणि पाचही भावांकडून काम करून घ्यायचे. कामाच्या वेळी कोणी सापडले नाही तर आम्हाला लाठ्यांनी मारहाण करायचे. आम्ही सर्व भाऊ बाईकवर 2-2 सिलेंडर हॉटेल आणि घरापर्यंत पोहचवायचो. आम्ही सगळ्यांनी वडिलांना साथ दिली आहे. याशिवाय जिथे जिथे सामने असायचे तिथे सगळे भाऊ एकत्र खेळायला जायचो.

परिसारत आणखी 6-7 मुलं होती. आम्ही पैसे एकत्र जमा करून चेंडू आणायचा. टेनिस आणि लेदर बॉलने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. यावेळी उत्तर प्रदेशातील अलीगढ येथील मॉडर्न स्कूलमधूनही क्रिकेट खेळलो आहे. आंतरशालेय स्पर्धेत 32 चेंडूत 54 धावांची नाबाद खेळी खेळली आहे. सुरुवातीला क्लब क्रिकेट खेळायला पैसे नसल्यामुळे सरकारी स्टेडियममध्ये सराव करायचो. सामने खेळण्यासाठी घरच्यांकेड पैसे मागायचो तर घरचे अभ्यास करायला सांगायचे. आई मला खेळण्यासाठी मदत करायची, पण वडील नेहमी मला खेळू नको असे सांगायचे.

2 खोल्यांचे छोटेसे घर सर्वत्र चर्चेत
कोलकाताच्या विजयानंतर अलीगड स्टेडियमजवळील 2 खोल्यांचे छोटेसे घर सर्वत्र चर्चेत आले आहे. या घारत रिंकू आई-वडिल आणि 4 भावंडांसोबत राहायचा. मात्र आयपीएलमध्ये त्याला संधी मिळाल्यानंतर सर्व काही बदलले आहे.

रिंकूने सांगितला आयपीएल निवडीचा किस्सा
रिंकूने एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, “मला 20 लाखांत कोणीतरी विकत घेईल असे वाटले होते, पण मला 80 लाखांत विकत घेतले. त्यावेळी मी काही पैसे बचत करेन आणि चांगल्या घरात शिफ्ट होईल, असे ठरवले होते.
3 वर्षांपूर्वी कुटुंबावर 5 लाखांचे कर्ज होते. कर्ज फेडण्यात अडचणी येत होत्या. पण मला माहित होते की, क्रिकेट ही एकमेव संधी आहे. यूपीच्या 19 वर्षाखालील संघात खेळत असताना मला पैसे मिळायचे. या पैश्यातून मी कर्जाची परतफेड केली. 2 वर्षांपूर्वी भारताच्या 19 वर्षांखालील संघातही संधी मिळाली होती, पण अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत मी खेळू शकलो नव्हतो. कौटुंबिक अडचणी पाहता त्यावेळेला मी ठरवल की, संपूर्ण लक्ष क्रिकेटवर केंद्रित करावे लागेल.

मोटारसायकल जिंकल्यानंतर कुटुंबाचा माझ्यावर विश्वास वाढू लागला
रिंकू म्हणाला की, “दिल्लीतील एका स्पर्धेत मालिकावीर ठरल्यानंतर मोटारसायकल मिळाल्यामुळे कुटुंबाचाही माझ्यावर विश्वास वाढू लागला. या मोटारसायकलवरून सिलिंडरची डिलिव्हरी सुरू झाली. माझ्या भावाला मी काही काम शोधायला सांगितले. त्याने माझ्यासाठी एका कोचिंग क्लासमध्ये साफसफाई आणि लादी पुसण्याचे काम मिळवून दिले. मात्र मी नकार दिला. मला माहित होते की क्रिकेट माझ्यासाठी सर्वकाही आहे आणि त्यानंतर मी फक्त खेळावर लक्ष केंद्रित केले.

सुरुवातीला प्रशिक्षकाने केली मदत
रिंकू म्हणाली, “लहानपणी जेव्हा मी चांगले खेळू लागलो तेव्हा मला इतर संघांमध्ये संधी मिळू लागल्या. त्यासाठी पैसेही लागत नव्हते, प्रशिक्षक मसूद अमिनी सरांनीही मला खूप मदत केली. मोहम्मद झीशान भैया यांनी मला क्रिकेट किट मिळवून दिली. 2010-11 मध्ये मी UP राज्य अंडर-16 सांघिकसाठी चाचण्या दिल्या, पण मी पहिल्या फेरीत बाहेर पडलो. त्यानंतर 2012 मध्ये पहिल्यांदा 16 वर्षाखालील संघात निवड झाल्यानंतर मी पहिल्याच सामन्यात 154 धावांची खेळी केली. अंडर-19 संघात निवड झाल्यानंतर मी रणजी ट्रॉफीमध्येही पदार्पण केले. त्यानंतर पुन्हा विजय हजारे आणि सय्यद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफी खेळलो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -