कैरीचे गोड लोणचे

कैरीचे गोड लोणचे

कैरीचे गोड लोणचे

जेवणात लोणच असल्यास जेवणाची चव अधिक चविष्ट होते. त्यात जर गोड लोणचे असेल तर अधिक उत्तम. हे गोड लोणचे भाजी नसल्यास चपातीसोबत देखील खाऊ शकतो. मात्र, काहींना बाजारातील लोणच खाण्यास आवड नाही. अशा व्यक्तींनी घरच्या घरी तयार केलेले चविष्ट आणि गोड लोणचे एकदा तरी अवश्य करुन पहा.

साहित्य

कृत्ती

कैरीच्या मध्यम आकाराच्या फोडी करून घेणे. त्यानंतर धणे मेथीदाण्याची भरडपूड करुन घ्यावी. त्यानंतर गूळ बारीक किसून घेणे. त्यानंतर मोहरीडाळ, धणेपूड, मेथी पूड कोरडी भाजून घेणे. त्यानंतर हिग पूड घ्या. एका पातेल्यात लालतिखट, हिंग आणि सर्व मसाले एकत्र करून त्यावर थोडे गरम तेल ओतून घेणे. त्यानंतर किसलेले गूळ आणि मीठ टाकून एकत्र एकजीव करुन घेणे. त्यानंतर त्यामध्ये बारीक केलेल्या कैरीच्या फोडी घालून एकजीव करुन घ्या. त्यानंतर वरून तेलाची झणझणीत फोडणी करून लोणच्यावर ओतवून घ्या आणि हे लोणचे बरणीत भरून ठेवा. हे लोणचे अधूनमधून हलवत रहा, अशाप्रकारे घरच्या घरी गोड लोणचे तयार करा.

First Published on: June 12, 2019 6:00 AM
Exit mobile version