कुरळ्या केसांची निगा राखा

कुरळ्या केसांची निगा राखा

Curly Hair

लांबसडक, चमकदार, रेशमी केस महिलांच्या सौंदर्यात भर घालतात. मात्र, केस जर कुरळे असतील तर त्यांची निगा राखताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तेव्हा कुरळ्या केसांची काळजी घेताना उपयोगी पडतील असे सोपे उपाय पुढीलप्रमाणे

सौम्य शाम्पूचा वापर करा – तुमचे केस जर कुरळे असतील तर तुम्ही शाम्पू निवडताना काळजी घेणे गरजेचे आहे. कुरळ्या केसांसाठी सल्फेट नसलेल्या सौम्य शाम्पूची निवड करावी.

कंडिशनरचा वापर करावा – बहुतेक महिलांना वाटते की, केसांसाठी केवळ सिरमचा उपयोग केल्यास कुरळे केस व्यवस्थित राहतील. मात्र, त्यांचा हा समज चुकीचा असून, कुरळ्या केसांसाठी कंडिशनरचा वापर करणे गरजेचे असते. केस स्वच्छ करण्यासाठी कंडिशनरयुक्त शॅम्पूचा वापर करा. योग्य प्रमाणात शॅम्पूचा व कंडिशनरचा वापर केल्याने केसांमध्ये नैसर्गिक चमक निर्माण होते.

नियमित शाम्पूचा वापर टाळा – कुरळे केस असणार्‍या महिला केसांच्या सौंदर्यासाठी दररोज शाम्पूचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. असे केल्याने केसांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे आठवड्यातून एकदाच शाम्पूचा वापर करावा.

आठवड्यातून एकदा डीप कंडिशनिंग करा – कुरळ्या केसांचे सौंदर्य खुलविण्यासाठी आठवड्यातून एकदा डीप कंडिशनिंग करणे गरजेचे आहे. यामुळे तुमचे कुरळे केस मुलायम चमकदार दिसू लागतील.

तेलाने मसाज करा – कुरळ्या केसांच्या सौंदर्यासाठी आठवड्यातून किमान एकदा तेलाने मालिश करणे महत्त्वाचे आहे. जर तुमचे केस कुरळे असतील तर मॉइश्चराइज टिकवून ठेवणार्‍या तेलाचा वापर करावा.

First Published on: April 20, 2019 4:20 AM
Exit mobile version