उन्हाळ्यात अशी सांभाळा तुमची त्वचा

उन्हाळ्यात अशी सांभाळा तुमची त्वचा

उन्हाळ्यात अशी सांभाळा तुमची त्वचा

उन्हाळा सुरू झाला की, अनेक समस्या निर्माण होतात. जसे की, उन्हाने चेहरा काळा पडणे, त्वचा शुष्क होणे तसेच चेहरा तेलकट होणे. अशा समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक उपाय केले जातात. यामध्ये बाजारातील महागड्या क्रिमचा वापर केला जातो. परंतु या केमिकलयुक्त सौंदर्य प्रसाधनांचा वापर केल्यास त्याचे आपल्या नाजुक चेहऱ्यास आणि त्वचेस हानिकारक परिणाम देखील होतात. अशावेळी काही घरगुती उपाय केल्यास त्वचेची निगा राखली जाईल.

खूप पाणी प्या

उन्हाळ्यात खूप घाम येत असल्याने शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. शरीरात पाण्याची पातळी कमी झाली की, त्‍याचा परिणाम आपल्या त्वचेवर होतो. यासाठी शरीरातील पाण्याची कमी भरून काढण्यासाठी भरपूर पाणी प्या.

मेकअप कमी करा

मेक-अपमुळे त्वचेची छिदे बंद होतात त्‍यामुळे त्वचा कोरडी पडते. मेक-अप केल्यानंतर किंवा उन्हात फिरून आल्‍यानंतर चेहऱ्यावरील मेक-अप धुवून काढा. चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुतल्‍याने चेहऱ्यावरील सुक्ष्म छिद्रे रिकामी होतील आणि त्‍वचा उजळ राहील. दिवसातून किमान तीन ते चार वेळा थंड पाण्याचे चेहरा धुणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात जितका हलका मेकअप करू शकाल तितके चांगले. हेवी फाउंडेशन लावणे टाळा आणि मॉइश्चरायजरचा सुद्धा वापर कमी करावा.

शक्यतो हे टाळा

उन्हाळ्यात थंड वाटावे म्हणून आपण कोलड्रींगचे जास्‍त प्रमाणात सेवण करतो मात्र, शरीरासाठी ही सवय घातक आहे. उन्हाळ्यात कोलड्रींगसह चहा आणि कॉफीचे सेवनही कमी करा. जंकफुड, मसालेदार पदार्थ, मद्यपान करू नका तसेच मांसाहार करत असाल तर त्‍याचे प्रमाण कमी करा.

हे पदार्थ खा..

दुधाचे पदार्थ, पालक, कोबी, टॉमेटो, कलिंगड, खरबुज, यांचे सेवन केल्‍यास फायदेशीर ठरेल. ताक, लिंबुपाणी, पन्हे, कोकम सरबत, आवळा सरबत अशा द्रव्यांचे सेवन करने लाभदायक ठरते.

First Published on: March 29, 2019 9:06 AM
Exit mobile version