आता हळूहळू थंडी कमी होत असून उन्हाळ्याची सुरुवात होत आहे. उन्हाळ्याच्या दिवसातही आपल्या आरोग्यासोबत त्वचेची देखील काळजी घेतली जाते. उन्हाचा त्रास प्रत्येक व्यक्तीला कमी जास्त प्रमाणात होत असतो. उन्हाच्या त्रासामुळे शरीरावर मोठ्याप्रमाणात खाज आणि पुरळ येतात. तसेच यामुळे शरीरातील वेगवेगळ्या अवयवांवर याचा परिणाम झालेला दिसून येतो.
उन्हाळ्यात अशी घ्या काळजी
- थंड वातावरणात राहण्याचा प्रयत्न करावा किंवा वातानुकुलित वातावरणात रहावे. घामोळ्यांमुळे येणारी खाज कमी करण्यासाठी दिवसातून 2-3 वेळा गार पाण्याने अंघोळ करावी.
- घामाने भिजलेल्या ओल्या अंगावर कपडे घातले तर त्वचा लगेच खराब होते. त्यामुळे शरीर चांगले पुसून घ्या. तसेच ओले कपडे घातल्याने त्वचेवर पुरळ उठतात.
- ज्या लोकांना सिरोसिसचा आजार आहे त्यांना जास्त पुरळ येतात. कधीकधी हे त्वचेचे संक्रमण नखांपर्यंत देखील पोहोचते. यामुळे मोठा आजार उद्भवू शकतो. तसेच हे टाळण्यासाठी कोरडे कपडे घाला आणि शरीर कोरडे ठेवा.
- उन्हाळयात घाम सतत येत असल्यामुळे शरीरावर घामोळे येतात. तसेच शरीरात उष्णता वाढल्याने घाम येतो आणि या घामोळ्यामुळे शरीरावर परिणाम होतात. अशावेळी स्वच्छतेची काळजी घ्या. कोरफडीचे जेल घामोळ्या असलेल्या ठिकाणी लावा ज्यामुळे शरीराला थंड मिळेल.
- उन्हाळ्यात सैलसर, सुती कपडे परिधान करावे आणि कृत्रिम धाग्याचे कपडे वापरु नये. जेणेकरुन हवा खेळती राहावी तसेच रसदार फळे खावीत.
हेही वाचा :