पावसाळ्यात घ्या घराची अशी काळजी

पावसाळ्यात घ्या घराची अशी काळजी

पावसाळा आला की अनेक वेळा वेगवेगळ्या समस्या घरामध्ये उद्भवत असतात. इमारतीमध्ये घर असले तर गच्चीतून पाणी गळणे, भिंतीच्या रंगांना पोपडे येणे, भिंतीमध्ये पाणी झिरपणे अशा समस्या पावसाळ्यात येत असतात. म्हणून पावसाळ्यात आपले घर आणि इमारतीची कशी काळजी घ्यावी याविषयी आज जाणून घेणार आहोत.

इमारतीच्या गच्चीत पाणी साचतं असेल तर……

पाऊस सुरु होण्याआधी छपरांवरील किंवा गच्चीमधील असलेले पाइपलाइन आणि गटारे साफ करावे. तसेच उन्हाळ्यात गच्चीवर डांबर टाकूण घ्यावे. हे सर्व केल्यामुळे पावसाळ्यात गच्चीत आणि गटारात पाणी साचणार नाही.
गच्चीत साठलेली धूळ देखील काढून घ्यावी. बऱ्याच वेळा उन्हाळ्यात गच्चीवरच्या पाइप्सना तडे गेलेले असतात. हे आपल्याला पावसाळ्यात गच्चीचे पाणी पाइपमधून गळ्यावर कळते. अशा वेळी सर्व पाइपची पाहणी करुन पाइप बदलून घ्यावेत.

भिंतीवर तडे गेले असतील तर……

काही वेळा बिल्डिंग बाहेरच्या भिंतींना तडे पडलेले असतात. तर त्या तड्यांमधून पाणी झिरपते असे नाही. कित्येक वेळा ते तडे थोडे रुंद करण्याच्या नादात तिथूनच ओल येण्याची शक्यता असते. जेव्हा असे तडे गेले असतील तर ते वॉटर प्रुफिंगचे कंपाऊंड आणि पांढरे सिमेंट यांची एकत्रित पेस्ट करून तेवढे तडे भरावेत. त्यानंतर त्यावर हलका स्पंज मारावा आणि मग त्यावर थोडे पाणी मारावेत.

घराच्या छतातून पाणी गळत असेल तर……

जर स्लॅब गळती होत असले तर स्लॅबच्या आतील सळ्या गंजण्याची शक्यता असते. त्यामुळे स्लॅबला धोका पोहोचू शकतो. म्हणून जर छत गळत असेल तर जिथे गळत असेल त्याच्या वरच्या भागावर किती तडे गेले आहेत ते पाहावे आणि वॉटर प्रुफिंग वाजवून पाहावेत. जिथे डबडब असा आवाज येईल तो भाग हळुवार रीतीने काढून घ्यावा. त्यानंतर त्यावर केमिकलचा एक कोट मारावा आणि वरुन थोडी बारीक वाळू पसरावी. सिमेंट आणि वाळू मिश्रित गिलावा करावा. त्या गिलाव्यावर थोडे पाणी सोडून ठेवावे. जेव्हा क्युरिंग पूर्ण होईल तेव्हा ब्रशने पुन्हा केमिकलचा एक हात मारुन घ्यावा. मग पुन्हा एकदा पाणी साठवून छतातून पाणी गळते का हे तपासून पाहावे. अशा प्रकारे आपण आपल्या घराची पावसाळ्यात काळजी घ्यावी.

First Published on: July 13, 2019 4:00 PM
Exit mobile version