झुरळ पळवण्यासाठी करा ‘हे’ उपाय

झुरळ पळवण्यासाठी करा ‘हे’ उपाय

तेजपत्ता

झुरळ पळवण्यासाठी तेजपत्ता एक रामबाण उपाय आहे. स्वयंपाकघरात वापरात येणारा तेजपत्ता कुसकरुन ज्या ठिकाणी झुरळ येतात त्या ठिकाणी त्याचा चुरा ठेवावा. तेजपत्त्याच्या वासामुळे झुरळ त्या ठिकाणी फिरकत नाहीत.

बेकिंग सोडा

साखरेची पावडर आणि बेकिंग सोडा एकत्र करुन ज्या ठिकाणाहून झुरळ येतात तिथे ही पावडर ठेवावी. झुरळ साखर खाण्यासाठी येतील आणि साखर-बेकिंगचे मिश्रण खातील. बेकींग सोडा घातक असल्यामुळे झुरळ मरतात.

काकडी

झुरळ पळवण्यासाठी काकडीचा देखील वापर केला जातो. खिडकी आणि दरवाजावर काकडीचे स्लाईस कापून ठेवावे. काकडीच्या वासाने झुरळ जवळ येत नाहीत.

लवंग

झुरळाला घरातून पळवून लावण्यासाठी लवंगचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. ज्या ठिकाणी झुरळं येतात त्या ठिकाणी लवंग ठेवावे. लवंगच्या उग्र वासाने झुरळ पळून जाण्यास मदत होते.

केरोसिन

केरोसिनच्या वासाने झुरळ पळून जाण्यास मदत होते. ज्या ठिकाणी झुरळ येतात त्या ठिकाणी केरोसिन लावावे. परंतु या वासाने तुम्हालाही त्रास होऊ शकतो. त्यामुळे हा प्रयोग करताना काळजी घेतली पाहिजे.

First Published on: October 3, 2018 1:23 AM
Exit mobile version